Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकणात मुसळधारेचा इशारा

अमोल कुटे

Pune News : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर संततधार पाऊस पडत आहे. राज्यातही पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ७) कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट ) आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीत कायम आहे. राजस्थानच्या बिकानेरपासून, ग्वालियर जयपूर, सतना, दाल्तोंगंज, असनसोल ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. गुजरात ते केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी होऊ लागली आहे.

शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडील भागात संततधार पावसाने हजेरी लावली. विदर्भ, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असलेल्या इगतपुरी येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामान झाले असून, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.

आज (ता. ७) राज्यात पाऊस सक्रिय होण्याचे संकेत आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा (यलो अलर्ट) आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांतील पाऊस (मिमी) (सौजन्य : हवामान विभाग) :

कोकण : पालघर : जव्हार ४०, विक्रमगड ४०, वाडा ६१. रायगड : माथेरान ६१, रोहा ४३. रत्नागिरी : चिपळूण ६८, हर्णे ४४, मंडणगड ४५, राजापूर ९२, रत्नागिरी ६९, संगमेश्वर ६६. सिंधुदुर्ग : दोडामार्ग ४८, कुडाळ ५७. ठाणे : अंबरनाथ ४६, भिवंडी ४०, मुरबाड ४२, उल्हासनगर ४७.

मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर : आजरा ६२, चंदगड ५८, गगनबावडा ७१, शाहूवाडी ४५. नाशिक : इगतपुरी ११०, ओझरखेडा ३०, पेठ ५२. पुणे : लोणावळा कृषी ५६, वेल्हे ४८. सातारा : महाबळेश्वर ५७.

मराठवाडा : नांदेड : अर्धापूर २१.

विदर्भ : अमरावती : दर्यापूर २२. भंडारा : लाखंदूर २८, तुमसर २१. चंद्रपूर : सिंदेवाही २८, वरोरा २२.

यवतमाळ : मारेगाव ५१, पांढरकवडा २६.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

धुळे, जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT