Maharashtra Rain : अकोला जिल्ह्यात १० मंडलांमध्ये १०० मिलिमीटरच्या आत पाऊस

Rain Update : जुलैचा पहिला आठवडा संपायला आलेला असताना पेरणीलायक पाऊस सुद्धा झालेला नाही. अकोला जिल्ह्यात यंदा १० मंडले रेडझोनमध्ये आलेले आहेत.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Akola News : पश्‍चिम विदर्भात यंदा अकोला जिल्ह्यावर पाऊस रुसल्यासारखी परिस्थिती झाली आहे. कुठे समाधानकारक पाऊस झाला तर काही ठिकाणी जुलैचा पहिला आठवडा संपायला आलेला असताना पेरणीलायक पाऊस सुद्धा झालेला नाही. अकोला जिल्ह्यात यंदा १० मंडले रेडझोनमध्ये आलेले आहेत.

पावसाच्या पहिल्या जून महिन्यात बाळापूर, अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर या तालुक्यांत १०० मिलिमीटरच्या आत पाऊस झाला आहे. केवळ अकोट, तेल्हारा व पातूर या तीन तालुक्यांमध्ये १०० मिलीवर पावसाची नोंद झाली. पाऊस झालेला नसतानाही सिंचनाच्या आधारे बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली.

Rain Update
Maharashtra Rain : कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

बार्शीटाकळी तालुक्यात यामुळेच नियोजित ५६ हजार १०८ हेक्टरपैकी ४७९८९ हेक्टर म्हणजेच जिल्ह्यात सर्वाधिक ८५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. या पाठोपाठ बाळापूर तालुक्यात नियोजित ६०,४१९ पैकी ४७,३७० हेक्टर म्हणजेच ८७ टक्के, तर तेल्हारा तालुक्यात नियोजित ५१,५९१ पैकी ३५,९०८ हेक्टर म्हणजेच ७० टक्के पेरणी झाली. अकोट तालुक्यात ६० टक्के, पातूर ५६.७, अकोला ६५.१६ टक्के तर सर्वांत कमी ३८.१९ टक्के लागवड मूर्तिजापूर तालुक्यात झाली आहे.

मूर्तिजापूर तालुका यंदा पिछाडीवर

या वर्षात मूर्तिजापूर तालुक्यात संपूर्ण जून महिन्यात कमी पाऊस झालेला आहे. त्याचा परिणाम पेरण्यांवर झाला. यात सोयाबीनची नियोजित ३९,१६७ हेक्टरपैकी १९,८५०, तूर ११,५६९ तुलनेत ३,७१५, कपाशी १४,१०६ हेक्टर नियोजित पैकी २,६३२ हेक्टरवरच पेरणी होऊ शकलेली आहे.

Rain Update
Monsoon Update : मॉन्सून सक्रिय होण्याचे संकेत

जिल्ह्यातील पेरणी

पीक प्रत्यक्ष लागवड टक्के

ज्वारी २९५ ७

मका ३५१ २४९

तूर ४०९४० ७४

मूग ५९९ ३

उडीद ६५४ ६

सोयाबीन १५३७१८ ७७

कपाशी ८८४५१ ५८

एकूण २८५०२४ ६४.३२

या वर्षी १० ते १५ जूनपर्यंत पेरणीयोग्य पाऊस येईल व त्यानंतर पावसांत फारसा खंड पडणार नाही, असे हवामान अभ्यासक सांगत होते. पेरणी साधेल पीक चांगले येईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी ५ ते १० मेपासूनच बियाणे, खते औषधी खरेदीस प्रारंभ केला. काही प्रगत वाणांच्या बियाण्यांची टंचाईची आवई उठवत बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा उचलला. पण ना पाऊस झाला ना पेरणी झाली. यंदाच्या हंगामात असमतोल पाऊस झाला. आता पावसाने दिली उघाड दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे.
- राजू पाटील वानखडे, जांभा, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला

१०० मिलिच्या आतील मंडले

अडगाव ९२.२, पारस ८७.८, व्याळा ८४.४, वाडेगाव ९६.५, हातरुण ८६.३, बोरगाव ७२.४, शिवणी ९०.७, पळसो ९७.८, हदगाव ९०.३, लाखपुरी ८०.५,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com