Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023 : विदर्भ, मराठवड्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज !

Maharashtra rain update : मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.

Team Agrowon

Heavy rain in Maharashtra : राज्याच्या काही भागात आज पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. आज सकाळपासूनच राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये ढगाळ वातावारण होते. तर काही ठिकाणी पावसाने हजेरीही लावली. हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, खानदेश, मराठवाड्याचा काही भाग विदर्भात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज दिला.

उत्तर पश्चिम बंगालच्या क्षेत्रात निर्माण झालेली तीव्र दाब क्षेत्राची स्थिती पूर्व वायव्यकडे २० किलोमीटर प्रतितास वेगाने सरकत आहे. हे कमी दाब क्षेत्र पश्चिम बंगालमधील बंकुरा येथे पुरुलियापासून ७० किलोमीवर अंतरावर आहे. तर राचीपासून १८० किलोमीटरवर आहे. ही स्थिती पूर्व वायव्येकडे झारखंडच्या दिशेन सरकण्याची शक्यता असून पुढील १२ तासांमध्ये कमी दाब क्षेत्रात रुपांतर होण्याचा अंदाज आहे. तर पुढील २४ तासांमध्ये ही स्थिती ठळक कमी दाब क्षेत्रात रुपांतरीत होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तर प्रदेशातील गोरखपूर, गया, बंकुरा आणि उत्तर पश्चिम बंगाल भागात आहे. हा पट्टा बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात समुद्रपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे देशाच्या अनेक भागात पावसाचा अंदाज आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, खानदेश, मराठवाड्याचा काही भाग विदर्भात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज दिला. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.

विदर्भाचा उर्वरित भाग, कोकण आणि नाशिक, धुळे तसेच जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवड्यातील जालाना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर मराठवाडा आणि मद्य महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delay in E-Peek Pahani: ई-पीक पाहणीचा खेळखंडोबा

Yamuna River Pollution: यमुना नदी २०२९ पर्यंत स्वच्छ होईल : अमित शहा

Kharif Crop Crisis: पावसाच्या खंडाने पुणे विभागात खरीप अडचणीत

Trump Tariff Powers: ट्रम्प यांना मिळणार शुल्कवाढीचा अधिकार

Maharashtra Monsoon: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT