
Nagar News : अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पट्ट्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सातत्याने सुरू आहे. शुक्रवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत रतनवाडीत २४५, तर घाटघर येथे २५६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जोरदार पावसामुळे भंडारदरा धरणात पाण्याची वेगाने आवक होत असल्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे.
अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील पावसामुळे भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८३ टक्क्यावर स्थिर ठेवून चार दिवसांपासून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे हे पाणी निळवंडे धरणात येत आहे. त्यातून निळवंडे धरणाचा पाणीसाठा ही वेगाने वाढत आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता निळवंडे धरणामध्ये ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. भंडारदरा धरणातून गुरुवारी (ता.२७) रात्रीपासून १२,१९९ क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू होता. रात्री १० वाजता तो कमी करून साडेनऊ हजार करण्यात आला होता.
हरिचंद्रगड परिसरातील जोरदार पावसामुळे मुळा नदीतून कोतूळजवळ ११ हजार ५८७ क्युसेकने मुळा धरणात पाणी येत होते.
हे धरण ६० टक्के भरले आहे. पांजरे येथे १९९, वाकी येथे १२९, तर भंडारदरा येथे १६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नाशिकमधील पावसामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून मुळा नदीत विसर्ग केला जात आहे. तर पुणे जिल्ह्यातील पावसामुळे भीमा नदी ही दौंड पुलाजवळ दुथडी भरून वाहत आहे.
४० मंडलांत जोरदार पाऊस
नगर जिल्ह्यात गुरुवारी (ता.२७) दुपारनंतर पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत भीज पाऊस सुरू होता. जवळपास ४० पेक्षा अधिक महसूल मंडलांत जोरदार पाऊस झाला. जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, नगर, राहुरी, पाथर्डी, पारनेर येथे पाऊस अधिक होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.