Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : आज आणि उद्या मुसळधारेचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Rain Forecast : कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. आजही अनेक भागात पावसाचा अंदाज आहे. तर उद्यापासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी होऊन शनिवारपासून पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. तर माॅन्सूनचा परतीचा प्रवास आजही थबकलेला होता. 

माॅन्सूनने २३ सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरातमधून माघार घेतली होती. तर २४ नोव्हेंबरलाही आणखी काही भागातून माॅन्सून परतला होता. मात्र २५ सप्टेंबर आणि आज म्हणजेच २६ सप्टेंबरला माॅन्सूनचा प्रवास थबकला होता. आजही माॅन्सून एकाच जागेवर होता. 

हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने आज पालघर आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला.

तसेच धुळे, नंदूरबार, पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. 

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीगर, जालना, परभणी, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. 

उद्या म्हणजेच शुक्रवारी हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि ठाणे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि जळगाव जिल्ह्यात तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला होता. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT