Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : शनिवारपासून विदर्भ, मराठवाड्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

IMD alert : उद्यापासून राज्याच्या आणखी काही भागात पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Swapnil Shinde

Monsoon alert : राज्याच्या काही भागात आज हलक्या पावसाने हेजरी लावली. पण इतर भागात मात्र पावसाची उघडीप कायम होती. उद्यापासून राज्याच्या आणखी काही भागात पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या म्हणजेच शनिवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमवरावती, यवतमाळ, वाशीम, नागूपर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांधील काही भागांमध्येही जोरदार पाऊस होऊ शकतो. तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

तसेच रविवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. रविवारी विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि धाराशीव या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला.

राज्याच्या अनेक भागात शनिवारी आणि रविवारी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही देण्यात आला. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता काहीशी अधिक दिसू शकते. मात्र सर्वदूर जोरदार पावसासाठी शेतकऱ्यांनी आणखी वाट पाहावी लागू शकते, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Water Shortage: तलावांतील पाणी उपशावर निर्बंध

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’चा बॉयलर अग्निप्रदीपन

Land Survey Protest: ‘शक्तिपीठ’च्या मोजणीचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला

Agriculture Production: खानदेशात उडीद, मूग उत्पादन कमी

Sugarcane Farmers Crisis: थकीत ऊसबिलांमुळे कारखान्यांसमोर ऊस मिळविण्याची मोठी कसोटी

SCROLL FOR NEXT