Sugarcane Farmers Crisis: थकीत ऊसबिलांमुळे कारखान्यांसमोर ऊस मिळविण्याची मोठी कसोटी
Pending Sugarcane Payments Issue: पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असतानाच, सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी यंदा दुहेरी संकटात सापडले आहेत. मागील गळीत हंगामातील जाहीर अंतिम दरानुसार तब्बल ३२८ कोटी रुपयांची ऊसबिले २१ साखर कारखान्यांकडे थकीत आहेत.