Weather Update
Weather Update Agrowon
हवामान

Hailstorm Forecast : मराठवाड्यात गारपिटीचा इशारा

Team Agrowon

Weather Update पुणे : राज्याच्या भागात गुरुवारी (ता. १७) विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने (Stormy Rain) हजेरी लावली.

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात तुफानी गारपीट (Hailstorm) झाली आहे. पोषक हवामान असल्याने आज (ता. १८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे.

तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने (Weather Department) दिला आहे.

ढगाळ हवामान, पावसाळी वातावरणामुळे अनेक भागांत सूर्यदर्शन झाले नाही. तर अनेक ठिकाणी ऊन, सावल्यांचा खेळ सुरू असल्याने कमाल तापमानात मोठी घट झाली आहे.

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्याही खाली घसरले आहे. राज्यात कमाल तापमान २४ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते.

उत्तर तमिळनाडू ते उत्तर कोकणपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राजस्थानपासून बांगलादेशपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्‍चिम कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

नैॡत्य राजस्थान आणि कच्छ परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. १८) राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाचा इशारा कायम आहे. अनेक जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.५ (१५.२), जळगाव ३०.७ (२२.२), धुळे ३० (१६), कोल्हापूर ३३.७ (२०.८), महाबळेश्‍वर २७.४ (१३.४), नाशिक २४.७ (१६.२), निफाड ३१.६ (१४.५), सांगली ३३.२ (१९.८),

सातारा ३०.१ (१६.४), सोलापूर ३४.४(२०), सांताक्रूझ ३४ (२३), डहाणू ३२.६ (२१.६), रत्नागिरी ३२.७ (२३.७), छत्रपती संभाजीनगर २४.२ (१३), नांदेड ३१.६ (१९.६),

परभणी ३०.४ (१९.२), अकोला २७.१ (१८.२), अमरावती २८.६ (१६.३), बुलडाणा २६.५ (१८.५), ब्रह्मपुरी ३१.८ (२१.२), चंद्रपूर ३२.० (२१), गडचिरोली ३१.२ (१८.४), गोंदिया ३०.४ (१९.६), नागपूर ३० (१७.७), वर्धा ३४.९ (१८), वाशीम २६.२ (१६), यवतमाळ २८ (१६.५).

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

मराठवाडा : हिंगोली, नांदेड, लातूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम. यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT