Cloudy Weather : ढगाळ वातावरणाने उडवली शेतकऱ्यांची झोप

रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्याचे पीक जोमाने काढले जात आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या वादळ व पावसामुळे बऱ्याच ठिकाणी गव्हाचे पीक जमिनीवर लोळले होते.
Cloudy Weather
Cloudy WeatherAgrowon
Published on
Updated on

Weather Update अकोला ः आठवडाभरात दुसऱ्यांदा पावसाचे ढग (Cloudy Weather) घोंघावू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. १५ मार्चपासून पावसाचा इशारा (Rain Forecast) देण्यात आल्यामुळे रब्बीतील गहू, हरभरा काढणीसाठी (Rabi Crop Harvesting) शेतकऱ्यांची एकच लगबग दिसून आली.

रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्याचे पीक जोमाने काढले जात आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या वादळ व पावसामुळे बऱ्याच ठिकाणी गव्हाचे पीक जमिनीवर लोळले होते. संत्रा बागांमध्ये फळे मोठ्या संख्येने जमिनीवर गळाली.

Cloudy Weather
Cloudy Weather : ढगाळ वातावरण, धुक्यामुळे हरभरा पिकाला फटका

रब्बी ज्वारी, मका तसेच भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या या आघातातून शेतकरी कसेबसे बाहेर निघत नाही तोच आता चार दिवस पावसाचा अंदाज आला. मंगळवारी (ता.१४) दिवसभर ढगाळ वातावरण तयार झाले होते.

सध्या रब्बीतील पिके काढणीला आली असून हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार २० मार्चपर्यंत अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. आधीच खरीप हंगामातही पावसाने धुमाकूळ घालत हंगाम नेस्तनाबूत केला होता.

Cloudy Weather
Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

आताही तीच पुनरावृत्ती होत आहे. पिके घरात आणण्याची वेळ आली तर पुन्हा पावसाचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जेवढे पीक घरात आणता येईल, यासाठी शेतकरी लगबग करीत आहेत.

सर्वत्र शेतशिवारांमध्ये गहू, हरभरा काढणीचे काम जोमाने केले जात आहे. कुठे हरभऱ्याचे ढीग लावून त्याला व्यवस्थित झाकण्याचे कामही शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com