Monsoon 2024 Agrowon
हवामान

Monsoon Rain : पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज; राज्यातील अनेक भागात जोरदार पावसासाठी पोषक स्थिती

Weather Update : राज्यातील अनेक भागात पुढील ५ दिवसपावसाचा अंदाज आहे, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे. पण सर्वदूर जोरदार पावसाची प्रतिक्षा काही भागात कायम आहे. राज्यातील अनेक भागात पुढील ५ दिवसपावसाचा अंदाज आहे, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. 

पुढील ५ दिवसांमध्ये पावसाच्या अंदाजाविषयी बोलताना माणिकराव खुळे म्हणाले की, आजपासून पुढील ५ दिवस म्हणजे रविवारपर्यंत मुंबईसह कोकण आणि विदर्भातील अठरा जिल्ह्यांमध्ये जोरदार तर संपूर्ण मराठवाडा, खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. 

पुढील ५ दिवस पाऊस पडण्यासाठी नेमक्या कोणत्या वातावरणीय प्रणाल्या पुरक असतील? याविषयी त्यांनी सांगितले की, माॅन्सूनचा ट्रफ दिड किमीलोमीरच उंचीचा असून दक्षिणेकडे झुकलेला आहे. ही एक प्रणाली पावसासाठी पोषक आहे. तसेच अरबी समुद्रातील ऑफ शोर ट्रफही पावसाला पोषक असेल.

सौराष्ट्र आणि कच्छवर ९०० मीटरवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच नाशिक ते वाशिम, गडचिरोली वरून जाणारा ३१०० मीटरच्या वर साडेचार किलोमीटर जाडीतील शिअर झोन तसेच शुक्रवारी बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार होणार आहे, या सर्व प्रणाल्या पावसासाठी पोषक आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात जोरदार आणि सलग पावसाचा अभाव का आहे? याविषयी श्री खुळे म्हणाले की,       माॅन्सूनच्या सक्रियता व कमकुवतताचे हेलकावे अजूनही संपलेले नाहीत. त्यामुळे माॅन्सूनच्या बळकट सक्रियेतून व्यापक परिक्षेत्रावर अधिक काळ सतत पडणारा झडीच्या पाऊस कोकण व विदर्भ, वगळता महाराष्ट्रात अजूनही पडलेला नाही. परंतु सध्य:स्थितीतील वातावरणीय प्रणल्या बघता ही स्थिती निवळेल, असे वाटते, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT