Monsoon Rain : पुढील ५ दिवस पाऊस कसा राहणार ? पावसासाठी काही वातावरणीय प्रणाल्या पोषक ठरत असल्याचा अंदाज

Weather News : पुढील ५ दिवस काही भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
Monsoon
MonsoonAgrowon
Published on
Updated on

Pune News : जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्यापही जोरदार पाऊस सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. पण राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस काही भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

पुढील ५ दिवस राज्यात पाऊस कसा राहू शकतो? या प्रश्नाचे उत्तर देताना हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, मध्य महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून हलका का होईना पण होत असलेल्या पावसाचा जोर, नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यात व पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा तालुक्यात अजूनही कायम आहे. पण रविवारपासू पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी इतर प्रणल्यातून तेथे मध्यम पावसाची शक्यता टिकून आहे. तर पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव आणि चांदवड तालुक्यात १० जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. 

Monsoon
Maharashtra Rain : कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या सरी

मराठवाड्यात १० जुलैपर्यंत जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात मध्यम तर छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. कोकण व विदर्भात जोरदार पावसाचे सातत्य जरी टिकून असले तरी वातावरणीय प्रणल्यांच्या प्रमाणात अपेक्षित अतिजोरदार पाऊस जाणवत नाही. विदर्भातही मध्यम पाऊस सध्या जाणवत आहे. येत्या पाच दिवसात ह्या ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया ह्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस कधीपासून पडू शकतो? याविषयी बोलताना माणिकराव खुळे म्हणाले की, विभागवार प्रणल्यातून चांगल्या पावसाची अपेक्षा असताना महाराष्ट्रात सध्या व्यापक जोरदार पाऊस न होता भाग बदलतच मध्यम पाऊस होत आहे. काही जिल्ह्यात अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. परंतु आता देशाच्या मध्यावर स्थापित झालेला मुख्य मान्सूनी आस त्याच्या सरासरी जागेपासून अधिक दक्षिणेला जोपर्यंत सरकत नाही तोपर्यंत नद्या खळखळून धरणात आवक वाढणार नाही. अर्थात ही शक्यता ह्या जुलै महिन्यात घडून येऊ शकते.

Monsoon
Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर पुन्हा वाढणार

एमजेओ आणि महाराष्ट्रातील पावसाचा संबंध आहे का? याविषयी बोलताना श्री. खुळे म्हणाले की,  'एमजेओ' अर्थात मॅडन ज्यूलियन ऑसिलेशनची विषुववृत्तीय मार्गक्रमणातील वारी सध्या भारतदेश समुद्रीय क्षेत्रातून २७ जून ते १० जुलै दरम्यान मार्गस्थ होत आहे. त्याची बळकटी दाखवणारा 'आम्प्लिटुड' एकच्या आसपास आहे. 'एमजेओ' च्या ह्या वारीचे जेंव्हा २७ जूनला अरबी समुद्रातून प्रयाण झाले तेंव्हा मरगळलेला माॅन्सून सक्रिय झाला.

तो सह्याद्रीचा घाट चढला. आणि घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात २७ जूनपासून तो मध्यम पाऊस देत आहे. एमजेओच्या या वारीने सध्या बंगाल उपसागरात प्रवेश केला आहे. माॅन्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेलाही त्यामुळे बळ मिळू लागले आहे व मराठवाड्यात ६ जुलैपासून तर विदर्भात आजपासूनच पावसाचा काहीसा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल व आसामकडील ७ राज्यात १० जुलैपर्यंत अतिजोरदार ते अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यताही त्यामुळे जाणवत आहे. 

राज्यात कोणत्या प्रणाल्यांमुळे पाऊस पडू शखतो? याविषयी सांगताना श्री. खुळे म्हणाले की, माॅन्सूनने देश काबिज केल्यामुळे देश मध्यावरचा पुर्वो-पश्चिमी मुख्य माॅन्सूनी आस सरासरी जागेवर तसेच अरबी समुद्रातील  पश्चिम किनारपट्टीसमोरील दक्षिणोत्तर तटीय आस, स्थापित झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही मराठवाडा वगळता १० जुलैपर्यंत एमजेओ व माॅन्सुनच्या तसेच तटीय अश्या दोन्हीही आसामुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com