Weather News Agrowon
हवामान

Weather News : तापमानात चढ-उतार शक्य

Weather Update : राज्याच्या विविध भागात अंशतः ढगाळ हवामान झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा १४ अंशाच्या पुढे गेल्याने थंडी कमी झाली आहे.

Team Agrowon

Maharashtra Weather Update : राज्याच्या विविध भागात अंशतः ढगाळ हवामान झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा १४ अंशाच्या पुढे गेल्याने थंडी कमी झाली आहे. आज (ता. ४) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतातील राज्यात थंडी कडाका तीव्र झाल्याने, बुधवारी (ता. ३) राजस्थान मधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये अनेक भागात किमान तापमान ६ ते ९ अंशांच्या दरम्यान होते. तर पंजाब हरियाना, राजस्थानसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे. बुधवारी (ता. ३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १४ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. ४) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान असले तरी पावसाची शक्यता काहीशी कमी झाली आहे.

बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.५ (१३.६), धुळे ३१.० (१२.६), जळगाव ३१.८ (१५.५), कोल्हापूर ३०.० (१८.६), महाबळेश्वर २७.८ (१४.८), नाशिक २९.९ (१५.९), निफाड २९.४ (१३.०), सांगली ३०.५ (१७.७), सातारा ३०.१ (१५.०), सोलापूर ३२.०(१८.०), सांताक्रूझ ३१.३ (१८.४), डहाणू २७.० (१९.४), रत्नागिरी ३४.४ (२०.६), छत्रपती संभाजीनगर (१५.५), नांदेड २९.२ (१७.४), परभणी २९.१ (१६.४), अकोला ३०.२ (१६.२), अमरावती २९.४ (१४.५), बुलडाणा २९.५ (१७.५), ब्रह्मपुरी ३२.२ (१४.५), चंद्रपूर २८.६ (१४.४), गडचिरोली २९.२ (१४.४), गोंदिया २८.८ (१३.६), नागपूर २८.९(१४.२), वर्धा २८.५(१४.८), वाशीम २९.४ (१५.६), यवतमाळ ३०.५ (१६.८).

कमी दाब क्षेत्र कायम
आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. या प्रणालीपासून केरळ ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT