Pune News : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भात मंगळवारी (ता. ५) व बुधवारी (ता. ६) विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्याजवळील ईशान्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणाली पासून आग्नेय मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. ४) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून, तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
रविवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३१.७ (१७.५), जळगाव २८.२(१७.८), कोल्हापूर २९.७ (२०.०), महाबळेश्वर २६.६ (१५.८), नाशिक २९.२ (१९.६), निफाड २८.० (१९.०), सांगली २९.१ (१९.१), सातारा ३०.६ (१८.०), सोलापूर ३३.०(२०.२), सांताक्रूझ ३३.३ (२३.१), डहाणू २९.४ (२२.५), रत्नागिरी ३२.४ (२२.४),
छत्रपती संभाजीनगर - (२०.०), नांदेड ३०.२ (१९.४), परभणी २९.९ (१९.२), अकोला ३०.८ (२०.१), अमरावती ३०.४ (१९.९), बुलडाणा २७.७ (१८.६), ब्रह्मपुरी ३५.० (१८.६), चंद्रपूर ३१.८(१७.४), गडचिरोली ३२.० (१८.०), गोंदिया ३०.८ (१७.५), नागपूर ३१.०(१९.८), वर्धा ३०.८(१९.४), वाशीम २८.२(१७.८), यवतमाळ ३२.० (१९.२).
महाबळेश्वरला नीचांकी १५.८ अंश तापमान
पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान निवळताच कमाल तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम आहे. राज्याच्या काही भागात पहाटेच्या वेळी धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. रविवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १५.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.