Winter Season Agrowon
हवामान

Weather Update : किमान तापमानात चढ-उतार शक्य

Winter Season : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानाचा पारा कमी - अधिक होत आहे. विदर्भ आणि कोकणात उन्हाची ताप टिकून आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानाचा पारा कमी - अधिक होत आहे. विदर्भ आणि कोकणात उन्हाची ताप टिकून आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पहाटे गारठा दुपारी चटका अशी स्थिती कायम आहे. आज (ता. ६) राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दक्षिण मध्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मानारच्या आखातात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश निरभ्र होत आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे.

मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. डहाणू, रत्नागिरी, अमरावती, अकोला येथे ३५ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या उत्तरेकडे किमान तापमानात घट होत असून, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी निफाड १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडे पहाटे गारठा वाढत असला तरी राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात थंडीची प्रतीक्षा आहे.

मंगळवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.६ (१७.६), अहिल्यानगर ३१.० (१७.३), जळगाव - (१६.०), कोल्हापूर ३१.३ (२०.६), महाबळेश्वर २६.५ (१६.६), मालेगाव ३१.० (१८.२), नाशिक ३१.८ (१६.७), निफाड ३२.० (१५.५), सांगली ३२.७ (१९.५), सातारा ३१.४ (१८.६), सोलापूर ३४.८ (२२.०), सांताक्रूझ ३५.५ (२२.८),

डहाणू ३५.४ (२२.३), रत्नागिरी ३५.२ (२३.०), छत्रपती संभाजीनगर ३२.३ (१७.४), बीड ३२.०, नांदेड (१८.८), धाराशिव ३०.९ (१९.०), परभणी ३२.७ (२०.३), अकोला ३५.१ (२०.४), अमरावती ३५.२ (१९.८), भंडारा ३२.२, बुलडाणा ३१.६ (१९.२), ब्रह्मपुरी ३४.३ (१९.८), चंद्रपूर ३३.४ (१९.२), गडचिरोली ३३.० (१९.२), गोंदिया ३३.४ (१७.४), नागपूर ३३.४ (१७.४), वर्धा ३३.४ (२०.४), वाशीम ३४.४, यवतमाळ ३३.२ (१९.०).

३५ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

सांताक्रूझ ३५.५, डहाणू ३५.४, रत्नागिरी ३५.२, अमरावती ३५.२, अकोला ३५.१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT