November Weather : नोव्हेंबरमध्ये थंडी कमी राहणार

Winter Update : महाराष्ट्रात देखील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याचे संकेत असल्याने राज्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे.
Weather
WeatherAgrowon
Published on
Updated on

Pune News : नोव्हेंबर महिन्यात देशात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. यातच महाराष्ट्रात देखील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याचे संकेत असल्याने राज्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे. राज्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

नोव्हेंबर महिन्यातील पाऊस आणि कमाल, किमान तापमानाचा अंदाज वर्तविण्यासाठी शुक्रवारी (ता. १) आयोजित पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. नोव्हेंबर महिन्यात वायव्य भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता अधिक आहे.

Weather
Maharashtra Rain : तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता कायम

महाराष्ट्रात किमान तापमान अधिक राहणार असल्याने नोव्हेंबरमध्ये थंडी कमी राहण्याचे संकेत आहेत. तर वायव्य आणि पश्‍चिम मध्य भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबरमध्ये देशात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. या काळात प्रामुख्याने दक्षिण भारतातील राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो. १९७१ ते २०२० या काळातील दीर्घकालीन सरासरीनुसार दक्षिण भारतात नोव्हेंबरमध्ये ११८.७ मिलिमीटर, तर संपूर्ण देशात सरासरी २९.७ मिलिमीटर पाऊस पडतो. नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतात १२३ टक्क्यांपेक्षा अधिक, तर देशात ७७ ते १२३ टक्के पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Weather
Paus Andaj : उद्यापासून पावसाची उघडीप राहणार; राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज

ऑक्टोबरमध्ये किमान तापमानाचा उच्चांक
यंदाच्या ऑक्टोबरमध्ये किमान तापमानाचा पारा आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर राहिल्याचे दिसून आले. ऑक्टोबरमध्ये सरासरी २१.८५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. १९०१ पासूनच्या नोंदी विचारात घेता यंदा ऑक्टोबरचे सर्वांधिक किमान तापमान ठरले आहे. यापूर्वी १९५१ मध्ये सरासरी २१.२८ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती.


मॉन्सून परतीच्या काळात महाराष्ट्रात अधिक पावसाची नोंद

यंदा मॉन्सून परतीच्या काळात महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. १ ते ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल ८६.२ मिलिमीटर, म्हणजेच सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस पडला. कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. तर मराठवाड्यात सरासरी इतका, तर विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. पावसाने हजेरी लावली असली, तरी राज्याच्या बहुतांश भागात यंदा ‘ऑक्टोबर हीट’चा चटका तापदायक ठरला.

ऑक्टोबर महिन्यात देशात सरासरी इतका पाऊस झाला. या काळात ‘डाना’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. नोव्हेंबरमध्ये प्रशांत महासागरातील पृष्ठभागाचे तापमान कमी होत असून, वर्षअखेरीस प्रशांत महासागरात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. तर इंडियन ओशन डायपोल (आयओडी) तटस्थ राहण्याचे संकेत आहेत. नोव्हेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, हवामान विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com