Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : कमाल-किमान तापमानात चढ -उतार होण्याची शक्यता

Rain Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे.

अमोल कुटे

Pune News : नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. किमान तापमानात घट न झाल्याने अद्यापही गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे. आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. शुक्रवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील देवगड येथे ९० मिलिमीटर, कुडाळ येथे ५० मिलिमीटर, लांजा, मुलदे आणि वैभववाडी येथे ४० मिलिमीटर, कणकवली ३०, मालवण, दापोली २० मिलिमीटर, मध्य महाराष्ट्रातील पंढरपूर येथे २० मिलिमीटर तर मराठवाड्यातील वाशी येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले.

अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान होत आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम आहे. शुक्रवारी (ता.१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३६.७ अंश तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी येथे ३६ अंश, तर अकोला, अमरावती, सोलापूर येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

शुक्रवारी (ता. १) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३३ (१९.९), अहिल्यानगर ३२.८ (२०.७), जळगाव ३४.८ (१८.७), कोल्हापूर ३१.६ (२३.७), महाबळेश्वर २८.४ (१८.८), मालेगाव ३२.४ (१९.२), नाशिक ३२.८ (१७.४), निफाड ३३.१ (१८), सांगली ३२.३ (२३.५), सातारा ३२.२ (२१.९), सोलापूर ३५ (२५.२), सांताक्रूझ ३६.७ (२३.६), डहाणू ३४.५ (२२.७), रत्नागिरी ३४.५ (२३), छत्रपती संभाजीनगर ३४.६ (२०.८), परभणी ३३.५ (-), अकोला ३५.४ (२१.५), अमरावती ३५.२ (१९.२), भंडारा ३४ (२१), बुलडाणा ३२.४ (२०.४), ब्रह्मपुरी ३६ (२२.५), चंद्रपूर ३४ (२०), गडचिरोली ३२.६ (२०.६), गोंदिया ३४.४ (१८.३), नागपूर ३४.५ (१८.८), वर्धा ३४ (२०), वाशीम ३४ (-), यवतमाळ - (१९.५).

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

विजांसह पावसाची शक्यता :

सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT