Weather Agrowon
हवामान

Weather Forcast : ढगाळ हवामानासह अल्प पावसाची शक्य

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन ते १०१४ हेप्टापास्कल इतके होताच कमाल व किमान तापमानात घसरण होईल. रात्री व सकाळच्या वेळी थंडीचे प्रमाण व तीव्रता अधिक जाणवेल.

 डॉ. रामचंद्र साबळे 

Maharashtra Weather : महाराष्ट्रावर आजपासून (ता.३) गुरुवार (ता. ७) पर्यंत १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील. तसेच हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आजपासून मंगळवार (ता.३ ते ५) या कालावधीत कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.

विदर्भात उद्यापासून (ता. ४ ते ६) बुधवारपर्यंत हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होईल. शुक्रवार (ता. ८)नंतर महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन ते १०१४ हेप्टापास्कल इतके होताच कमाल व किमान तापमानात घसरण होईल. रात्री व सकाळच्या वेळी थंडीचे प्रमाण व तीव्रता अधिक जाणवेल.

आज (ता. ३) बंगालच्या उपसागरातील पश्‍चिम भागात चक्रीयवादळाची निर्मिती होईल. त्यामुळे बंगालचे उपसागराचे पश्‍चिम भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन तेथे ९८७ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील.

या चक्रीयवादळाला गती प्राप्त होऊन ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने जाऊन मंगळवारी (ता. ५) किनारपट्टीला धडकेल. त्याजवळील भूप्रष्ठावर वादळी वारे व जोराचा पाऊस होईल. त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात जाणवेल.

हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्टभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तसेच अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत, तर प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस असल्याने ‘एल निनो’चा प्रभाव जाणवणार नाही. अशा प्रकारच्या हवामानामुळे अवेळी पावसाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोकण

सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत आज (ता.३) अत्यल्प पावसाची शक्यता आहे. तर उद्या (ता.४) हवामान कोरडे राहणे शक्य आहे. तसेच मंगळवार (ता. ५) पर्यंत हवामान कोरडे राहील. सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कमी होऊन ती ६० ते ७० टक्के इतकी राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. आणि वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र

आज व उद्या (ता.३,४) नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव या सर्व जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान जळगाव जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर धुळे व नाशिक जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस व नंदूरबार जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर नाशिक जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ७६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ५१ टक्के राहील. हवामान कोरडे राहील.

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आज व उद्या (ता.३,४) अल्पशा पावसाची शक्यता आहे. आज (ता.३) बीड व जालना जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही.

आज (ता. ३)पासून मंगळवार (ता. ५)पर्यंत हवामान कोरडे राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. धाराशिव व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १६ कि.मी. राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १३ कि.मी. राहील. कमाल तापमान हिंगोली व परभणी जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान नांदेड व जालना जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर लातूर व बीड जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील.

धाराशिव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, नांदेड, बीड, परभणी हिंगोली व जालना जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ

आज (ता.३) बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १५ कि.मी. राहील.

कमाल तापमान बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ४० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ४० टक्के राहील.

मध्य विदर्भ

आज (ता. ३) नागपूर जिल्ह्यात अत्यल्प पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १५ कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर नागपूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ४० टक्के राहील.

पूर्व विदर्भ

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांत कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस, तर गोंदिया जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २९ ते ३३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ताशी ९ ते १२ कि.मी. इतका राहील. वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

आज (ता.३) कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत १ ते २ मिलिमीटर पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर जिल्ह्यात १४ कि.मी., तर सांगली व नगर जिल्ह्यांत ताशी १२ कि.मी., पुणे जिल्ह्यात ताशी ११ कि.मी., तर कोल्हापूर जिल्ह्यात ताशी ८ कि.मी. राहील.

कमाल तापमान सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस तर पुणे, नगर, सांगली व सातारा जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील.

कृषी सल्ला

पाण्याची सोय असल्यास मका, ज्वारी, लसूणघास, बरसीम या चारा पिकांची लागवड करावी.

गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान किती झाले आहे, त्यानुसार योग्य उपाययोजना कराव्यात.

तूर पिकात कीड नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT