Cloudy Weather : खानदेशात ढगाळ वातावरण; किमान तापमानात वाढ

Weather Update : खानदेशात मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण कायम आहे. गारठा कमी झाला असून, किमान तापमानात वाढ झाली आहे.
 cloudy weather
cloudy weatherAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण कायम आहे. गारठा कमी झाला असून, किमान तापमानात वाढ झाली आहे. रब्बी पिकांसाठी प्रतिकूल स्थिती असल्याने याचा पीक वाढीला फटका बसत आहे.

सध्याच्या हवामानामुळे केळीसह भाजीपाला, फळ पिकांत बुरशीजन्य रोग सक्रिय होत आहेत. यामुळे शेतकरी बुरशीनाशके, कीडनाशके व संप्रेरकांची फवारणी घेत आहेत. यात पीक उत्पादन खर्च वाढत असल्याची स्थिती आहे.

हरभरा, दादर ज्वारी यांची पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु या पिकांच्या पेरणीनंतर हवी तशी थंडी नाही. नोव्हेंबर महिना संपत आला आहे. परंतु थंडी नसल्याने पीकवाढीला फटका बसत आहे. विशेषतः कोरडवाहू रब्बी पिकांची हानी होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. थंडी कमी झाल्याने सिंचनासंबंधी कार्यवाही करावी लागत आहे.

 cloudy weather
Cloudy Weather : ढगाळ वातावरणाचा धसका

केळीला सध्या रोज दोन तास पाणी द्यावे लागत आहे. कारण दुपारी उष्णता असते. कमाल तापमान ३० अंश सेल्सीअसपर्यंत असते. तर किमान तापमान १३ अंश सेल्सीअसपर्यंत राहत आहे. लहान व निसवलेल्या केळी पिकात विषम वातावरणामुळे हानी होत असून, रोगराईची समस्या कायम आहे.

या काळात केळीसाठी निरभ्र, कोरड्या वातावरणाची गरज असते. थंडीत शेतकरी खत व्यवस्थापन करून पीक वाढवितात. परंतु यंदा हिवाळ्याचे दोन महिने थंडीच नसल्याची स्थिती आहे. ऑक्टोबरमध्ये उष्णता ३५ अंश सेल्सिअसवर होती. या महिन्यातही कमाल तापमान सरासरी ३० अंश सेल्सिअस राहिल्याने रब्बीचे गणित बिघडू लागले आहे.

 cloudy weather
Cloudy Weather : पुणे जिल्ह्यात ढग दाटले

मागील सात ते आठ दिवसांपासून सकाळपासून ढगाळ वातावरण असते. अधूनमधून काहीशी निरभ्र स्थिती तयार होते. पण मध्येच ढग येतात. दुपारी उकाडा असतो. सायंकाळीदेखील उकाडा असतो. मध्यरात्रीनंतर थंड वातावरण तयार होते. या महिन्यात किमान तापमान १० अंश सेल्सीअसखाली गेलेच नाही. यामुळे गहू पेरणीवरही परिणाम झाला आहे.

पपई, केळीची काढणी वेगात

खानदेशात मागील काही दिवसांत अनुकूल स्थिती नसल्याने शेतकरी केळी व पपईची काढणी करून घेत आहेत. कारण पाऊस किंवा गारपिटीत नुकसान होते. प्रशासनाने पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, पिकांची काळजी घ्यावी, असे म्हटले आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. टोमॅटो, कारली, गिलके, भेंडी, केळी, पपई आदी पिकांमध्ये काढणीची लगबग सध्या दिसून येत आहे. तसेच केळी, कलिंगड लागवड, शेतांची मशागत आदी कामेही शेतकरी उरकून घेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com