Solapur Rain Update Agrowon
हवामान

Solapur Rain Update : सोलापुरात शिडकावा, ढगाळ वातावरणाने चिंता

Solapur News: गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. दोन दिवसांपासून सूर्यदर्शनही उशिरा होत आहे.

Team Agrowon

Solapur Rain : सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, बुधवारी (ता. १५) रात्री जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हलका शिडकावा केला, तर अनेक भागांत ढगाळ वातावरण राहिल्याने ऐन काढणी हंगामात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. दोन दिवसांपासून सूर्यदर्शनही उशिरा होत आहे. सकाळी गार वारा आणि ढगाळ वातावरण निर्माण होते आहे. बुधवारी (ता. १५) वातावरणात एकदमच बदल झाला.

मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, बार्शी या तालुक्यांत विजांच्या कडकडटासह अनेक भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली. गुरुवारीही सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान अनेक भागातं अशीच हलकी हजेरी लावली.

सध्या खरीप हंगामातील ज्वारी, गव्हाची काढणी सुरू आहे. तसेच द्राक्ष, डाळिंब या फळांचीही काढणी सुरू आहे. पण पाऊस त्यात अडथळे आणत आहे.

मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट भागात ज्वारी, गव्हाचे क्षेत्र चांगले आहे. पण या पावसामुळे त्याला फटका बसत आहे.

सध्या डाळिंबाला दर आहेत, पण तेवढी आवक नाही, तर द्राक्षाची आवक मोठी असतानाही दर नाही, अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे या बदलत्या वातावरणामुळे मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होतो आहे. वादळ, वारेही वाहत आहे. सध्या माझ्याकडे मक्याचे पीक आहे. हे वातावरण असेच राहिले, तर नुकसान होणार आहे.
नामदेव पवार, शेतकरी, फुलचिंचोली, ता. पंढरपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून, सरकारचा निर्णय, पण साखर उतारा घटणार?

Crop Damage : घेवडा करपल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Water Management Meeting: जल व्यवस्थापन बैठकीस शासनाच्या अधिकाऱ्यांची दांडी

Surya Ghar Yojana : सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत ७४ हजार ग्राहक वीज निर्माते

Nashik APMC : पांजरापोळ प्रकरणात नाशिक बाजार समितीला दणका

SCROLL FOR NEXT