Climate Change Impact : यवतमाळ पावसाचा दीर्घ खंड आणि वाढत्या तापमानामुळे पुसद तालुक्यातील हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. लागवड आणि मशागतीवर एकरी लाख रुपयांहून अधिक खर्च झाल्याने उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत..पुसद तालुक्यात सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल वाढला आहे. सोयाबीनवरील रोगांचा प्रादुर्भाव, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता, तसेच ऊस शेतीतील अडचणींमुळे शेतकरी हळदीकडे वळले आहेत..Grape Orchard Damage: अज्ञात व्यक्तीकडून द्राक्षबागेवर तणनाशक फवारणी.पुसद तालुक्यात यंदा दोन हजार ६३१ हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. मात्र, वालतूर रेल्वे, कवडीपूर, भोजला आणि निंबी परिसरात हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाअभावी पिकाला पाण्याचा ताण बसत असून, काही शेतकऱ्यांचे जलस्रोतही आटण्याच्या मार्गावर आहेत..Crop Damage Compensation: पीक नुकसानभरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द करा; आमदार दिलीप बनकर यांची मागणी.हळदीला सध्या प्रतिक्विंटल २२ ते २५ हजार रुपये दर मिळत असल्याने उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, रोगाचा प्रादुर्भाव आणि पाण्याची कमतरता यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे..शेणखत, बेणे, लागवड, ठिबक सिंचन, खते, आंतरमशागत, निंदणी आणि फवारणी यासाठी एकरी लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. त्यामुळे उत्पादन घटल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची भीती आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला, तरी हळद उत्पादकांना या संकटातून सावरण्यासाठी कोणती मदत मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.