
देशातून अमेरिकेला तब्बल दोन वर्षांनंतर आंबा आणि डाळींब निर्यात होणार. दोन्ही देशांत कृषी उत्पादनांसाठी मार्केट उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नोव्हेंबर २०२१ मध्ये इंडिया-युएस ट्रेड पाॅलिसी फोरममध्ये घेण्यात आला होता. या महिन्यात निर्यातीची प्रक्रिया (export process) सुरु होणारे. निर्यातीसाठी परवानगी पुर्व तपासणी, विकिरण प्रक्रिया आणि हाताळणीची कामे सुरु आहेत. तर अमेरिकेतून एप्रिल २०२२ पासून देशात अल्फाअल्फा आणि चेरीची आयात होणार आहे, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्राल्याने सांगितले. मागील दोन वर्षांपासून अमेरिकेतील विकिरण प्रक्रिया निरिक्षण अधिकारी भारतात येऊ शकले नाहीत. त्यामुळं आंबा निर्यात (mango export) थांबली होती. तेव्हापासून भारताने अमेरिकेकडे तोडगा काडण्यासाठी पाठपुरावा केला होता. आता आंबा आणि डाळींब निर्यातीतील (pomegranate export) अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे देशातून निर्यात शक्य होणारे. केंद्रीय कृषी विभाग आणि अमेरिकेच्या कृषी विभाग यांच्यात दोन शेतीमाल निर्यातीसंदर्भात करार झाला.
1. राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने अनेक भागांत अंशतः ढगाळ हवामान होत आहे. उद्या मराठवाड्यात जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर लातूर, उस्मानाबाद तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. सोमवारपासून विदर्भात पावसाची शक्यता असून, अमरावती, नागपूर, वर्धा जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज आहे.
2. देशात खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपात केलीये. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याने देशातील ग्राहकांना फारसा दिलासा मिळाला नाही. डिसेंबर महिन्यात देशात ५ लाख ७५ हजार टन पाम तेलाची आयात झालीये. तर जानेवारी महिन्यातही पामतेल आयात वाढण्याची शक्यातये. सोयाबीन तेलाची ४ लाख टन तर सूर्यफुल तेलाची आडीच लाख टन आयात झालीये. या तेलांची जानेवारीत आयात घटण्याची शक्यताये.
3. मध्य प्रेदशातील अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याच्या नुकसानभरपाईसाठी तब्बल १५ महिने वाट पाहावी लागतेय. २०२० च्या खरिप हंगामात नुकसान झाल्यानंतर उत्पादकता काढण्यात दिरंगाई होत असल्याने शेतकरी वंचित आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचं सोयाबीनचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र राज्य सरकारने पीकविम्यातील आपल्या हिस्स्याव्यतिरिक्त मदत दिली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना पीकविम्याच्या आशेवरच थांबवं लागलं. मात्र १५ महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या पदरी प्रतिक्षाच आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.