Smart Farming : अमरावती यंदा कमी पाऊस आणि पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीनचे उत्पादन घटल्याने पुढील खरीप हंगामात बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दर्जेदार सोयाबीन बियाणे आत्तापासूनच राखून ठेवावे, असे आवाहन अमरावती विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे..अमरावती विभागात सोयाबीन हे प्रमुख खरीप पीक आहे. यंदा ‘एल निनो’च्या प्रभावासह कमी पर्जन्यमान आणि पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा फटका पिकाच्या उत्पादकतेला बसला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली असून महाबीजसह खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांच्या बियाणे उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला आहे. आगामी हंगामात पेरणीसाठी सोयाबीन बियाणे उपलब्ध होण्याबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीन बियाणे पुढील हंगामासाठी राखून ठेवण्याचे नियोजन करावे..Banana Farm Destroyed : अज्ञाताकडून तीन एकर केळीवर तणनाशकाची फवारणी.संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या आणि समाधानकारक दर्जाचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या पेरणीसाठी आवश्यक बियाणे वेगळे काढून ठेवावे. शक्य असल्यास परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे. यामुळे बियाण्यांची संभाव्य टंचाई कमी करण्यासोबतच रास्त किमतीत बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल. मात्र घरचे बियाणे राखून ठेवताना त्याची उगवणक्षमता टिकविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने मळणी आणि साठवणूक करणे आवश्यक आहे..Orange Damage: मृगबहार संत्राफळांचे नुकसान.मळणी यंत्राचा वेग प्रतिमिनिट ३५० ते ४०० फेऱ्यांपेक्षा कमी ठेवावा. वेगवेगळ्या वाणांचे बियाणे एकमेकांत मिसळणार नाही, याची काळजी घ्यावी. मळणीपूर्वी यंत्र स्वच्छ करून त्यातील मागील पिकाचे अवशेष काढून टाकावेत. त्यामुळे वाणांची भेसळ टाळता येते, बियाण्यांची साठवणूक करताना मोठ्या थप्प्या लावू नयेत. वाहतूक आणि हाताळणीदरम्यान बियाण्याला धक्के बसणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सोयाबीनचे बियाणे हाताळणीतील निष्काळजीपणामुळे खराब होऊन त्याच्या उगवणक्षमतेवर परिणाम होऊ शकतो..जिल्हानिहाय समन्वयकसोयाबीन बियाणे जतन विषयक मोहीम केवळ आवाहनापुरती न राबविता ती प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर समन्वयकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे या उपक्रमाच्या अंमलबजावणीत योगदान राहणार आहे..अनियमित पर्जन्यमान आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामातील संभाव्य बियाणे टंचाई टाळण्यासाठी अमरावती विभागात कृषी विभागामार्फत घरगुती सोयाबीन बियाणे जतन व साठवणूक मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे शास्त्रीय पद्धतीने जतन करावे आणि बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत स्वयंपूर्ण व्हावे.- गणेश घोरपडे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.