Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update: विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Rain Forecast: राज्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी, काही ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात श्रावण सरी कोसळत आहेत. आज (ता. ३१) विदर्भात विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी, काही ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात श्रावण सरी कोसळत आहेत. आज (ता. ३१) विदर्भात विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तसेच उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.

वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेरपासून, सिकार, दातीया, सिधी, रांची, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. मध्य प्रदेशापासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

बुधवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. बुधवारी दिवसभर मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. ढगाळ आकाश, पावसाची हजेरी गेले काही दिवस कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३० अंशांच्या खाली आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

जुलैच्या अखेरीस राज्यात पावसाने जोमदार हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिली असून राज्यात ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज (ता. ३१) अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. ३०) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२७.५---२१.९

‎‎धुळे---२९.०---२०.०

जळगाव---२७.६---२३.३

जेऊर---३१.५---२१.०

‎‎कोल्हापूर---२४.९---२१.७

‎महाबळेश्वर---१८.९---१७.६

मालेगाव---२६.४---२०.८

‎‎नाशिक---२६.३---२२.२

‎निफाड---२७.७----२२.२

‎सांगली---२८.१---२२.०

‎सातारा---२५.६---२२.०

‎सोलापूर---३१.८---२३.८

‎सांताक्रूझ---२९.६---२६.०

डहाणू---२९.२---२५.०

‎रत्नागिरी---२९.५---२४.५

छत्रपती संभाजीनगर---२६.४---२२.४

‎धाराशिव---२८.१---२१.२

‎परभणी---२७.५---२२.५

परभणी (कृषी)---२७.२---२२.०

‎‎अकोला---२७.०---२३.७

अमरावती---२५.४---२१.५

भंडारा---२७.०---२३.०

बुलडाणा---२५.४---२२.२

‎ब्रह्मपुरी---२५.४---२२.२

‎चंद्रपूर---२७.२---२३.६

‎गडचिरोली---२६.२---२२.८

‎गोंदिया---२७.१---२३.४

‎नागपूर---२५.७---२३.६

‎वर्धा---२६.०---२३.६

‎वाशीम---२५.२---२२.०

‎यवतमाळ---२५.०---२२.०

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT