Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Latest Rain Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. २०) पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, कोटा, गुणा, सिधी, रांची ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे. वायव्य राजस्थानपासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण राजस्थानमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे गुजरातमध्ये ढगाळ हवामानासह पाऊस सुरू आहे.

राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू असून, उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. आज (ता. २०) विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्राची निर्मिती

आग्नेय राजस्थान आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेल्यानंतर बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या या कमी दाब क्षेत्राला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली उद्यापर्यंत (ता. २१) उत्तर ओडिशा, दक्षिण झारखंडकडे सरकण्याचे संकेत आहेत.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT