Akola News : गेल्या आठवडयात दोन दिवस काही तालुक्यात चांगला पाऊस झाल्यानंतर रविवार (ता.१७) पासून पुन्हा पावसाचा जोर कमी झालेला आहे. गेल्या २४ तासांत काही मोजक्या मंडलांमध्ये हलका पावसाची नोंद झाली आहे.
दोन दिवस तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव आदी तालुक्यांत चांगल्या पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पुन्हा पाऊस ओसरला आहे.
सोमवारी (ता.१८) सकाळपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार अकोला जिल्ह्यात चोहोट्टा मंडलात १२.३, मुंडगाव ७, व्याळा ११.८, उरळ बुद्रुक ११.८, निंबा १३, हातरुण ११.८, बाळापूर ९.१, अकोला १७.८, उगवा १२.३, आगर १२.३, लाखपुरी ११.५, शेलू बाजार १०.३ मिलिमीटर पाऊस झाला. संपूर्ण वाशीम जिल्हा कोरडा राहलेला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात मेहुणाराजा या मंडलात ११ , काळेगाव १०.३ मिलिमीटर असा दोन मंडलांमध्ये दुहेरी आकड्यातील पाऊस झालेला आहे. उर्वरित सर्व मंडलांमध्ये अल्प स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. सोमवारी सर्वत्र पाऊस बंद होता.
यंदाच्या मोसमात पावसाचे साडेतीन महिने पूर्ण लोटले आहेत. तरीही सलग व दमदार पावासाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या महिन्यात मोठा खंड पडल्याने सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, ज्वारी, तूर या सर्वच खरीप पिकांना फटका बसलेला आहे. प्रकल्पांमध्येही पुरेसा साठा नाही.
पश्चिम विदर्भातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या खडकपूर्णामध्ये सध्या अवघा ६.७७ दलघमी साठा आहे. एकूण साठ्याच्या तुलनेत ७.२५ टक्केच हा प्रकल्प अद्याप भरला. त्यातुलनेत अकोल्यातील काटेपूर्णा ७५.६८ दलघमी भरले असून ७४.५३ टक्के आहे.
तर वान प्रकल्पातही ७२.४४ दलघमी साठा असून सरासरीच्या ८६.५३ टक्क्यांवर पोचला आहे. या प्रकल्पाच्या क्षेत्रात मागील आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने धरणात जोमाने आवक झाली. बुलडाण्यातील नळगंगा प्रकल्प २१.३२ दलघमी, पेनटाकळी ३०.२२ दलघमी भरला आहे.
प्रकल्प... पाऊस (मिमीमध्ये)
तालुका सरासरी पाऊस प्रत्यक्ष पाऊस टक्के
अकोट ६३२ ३३७.५ ५३.४
तेल्हारा ६१५ ५४० ८७.९
बाळापूर ५७३ ४०८ ७१.२
पातूर ७५९ ४५७ ६०.३
अकोला ६५० ४१४ ६३.७
बार्शीटाकळी ६५० ५१८ ७९.७
मूर्तिजापूर ६६० ४१० ६२.१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.