Rain Agrowon
हवामान

Rain Forecast : चांगल्या पावसाची शक्यता

Weather Forecast : या आठवड्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्केपेक्षा अधिक राहील.

 डॉ. रामचंद्र साबळे 

Maharashtra Weather Update : आजपासून मंगळवारपर्यंत (ता.९ ते ११) महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००२ तर मध्य व दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल इतके हवेचा दाब राहतील. त्यामुळे कोकण, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

तर उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. बुधवार ते शुक्रवार (ता.१२ ते १४) या कालावधीत महाराष्ट्राच्या उत्तरेस १००४ हेप्टापास्कल तर दक्षिण भागावर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील.

या आठवड्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्केपेक्षा अधिक राहील. तापमानात वाढ होताच, दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० टक्केपर्यंत राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैऋत्येकडून राहील.

अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे नैऋत्य मॉन्सूनच्या पावसाचा जोर अद्याप अपेक्षित इतका वाढलेला नाही.

कोकण ः

आज (ता.९) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ६० ते ६७ मिमी, तर पालघर जिल्ह्यात ४१ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.१०) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ५५ मिमी, तर पालघर जिल्ह्यात ४५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून आणि ताशी वेग १० ते १४ किमी राहील.

कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८६ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र ः

आज (ता.९) नाशिक जिल्ह्यात ३० मिमी, नंदूरबार जिल्ह्यात १६ मिमी आणि धुळे व जळगाव जिल्ह्यांत ७ ते ८ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.१०) नाशिक जिल्ह्यात ३२ मिमी, जळगाव जिल्ह्यात १५ मिमी, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ८ ते ९ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून आणि ताशी वेग १५ ते २० किमी राहील.

कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५९ टक्के राहील.

मराठवाडा ः

आज (ता.९) धाराशीव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ७ ते १३ मिमी, तर नांदेड जिल्ह्यात २३ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.१०) छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यांत २२ ते २७ मिमी, तर धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १७ मिमी पावसाची शक्यता आहे.

वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून आणि ताशी वेग १५ ते १७ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना जिल्ह्यांत ८० टक्के, तर बीड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ७४ ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ६० ते ६२ टक्के, तर धाराशिव, लातूर, बीड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ५३ ते ५७ टक्के राहील.

पश्चिम विदर्भ ः

आज (ता.९) बुलडाणा जिल्ह्यात ९ मिमी तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १७ ते १९ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.१०) बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १५ ते २० मिमी पावसाची शक्यता आहे.

वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून आणि ताशी वेग १५ ते १६ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६० टक्के राहील.

मध्य विदर्भ ः

आज (ता.९) वर्धा जिल्ह्यात १७ मिमी, यवतमाळ जिल्ह्यात ३५ मिमी व नागपूर जिल्ह्यात ४३ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.१०) सर्वच जिल्ह्यांत १४ ते १७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १९ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २६ किमी राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५९ टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः

आज (ता.९) गोंदिया जिल्ह्यात २५ मिमी, चंद्रपूर जिल्ह्यात ३३ मिमी, तर भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांत ३८ ते ४३ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.१०) चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ३५ मिमी, तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ४१ ते ५० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून आणि ताशी वेग ९ ते १४ किमी राहील.

कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६० टक्के राहील.

पश्चिम महाराष्ट्र ः

आज (ता.९) कोल्हापूर जिल्ह्यात ६० मिमी, सांगली जिल्ह्यात ३२ मिमी, सातारा व पुणे जिल्ह्यांत २१ ते २३ मिमी, तर सोलापूर व नगर जिल्ह्यांत ७ ते ९ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.१०) कोल्हापूर जिल्ह्यात ५३ मिमी व पुणे जिल्ह्यात ३८ मिमी, तर सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत १४ ते २१ मिमी व नगर जिल्ह्यात ७ मिमी पावसाची शक्यता आहे.

वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून आणि ताशी वेग ११ ते १९ किमी राहील. कमाल तापमान सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर पुणे व सांगली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, आणि कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ८२ टक्के राहील.

कृषी सल्ला ः

- जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये.

- मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग या पिकांच्या पेरण्या १५ जुलैपर्यंत पूर्ण कराव्यात.

- शेळ्या-मेंढ्यामध्ये रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.

- गोठा कोरडा राहण्यासाठी गोठ्यात चुना पसरावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT