Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पावसाची विश्रांती, हलक्या सरींची शक्यता

Rain Update : आज (ता. १३) राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : मध्य भारतातील कमी दाब क्षेत्राने बाष्प खेचून नेल्याने राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. पुढील तीन ते चार दिवस पाऊस विश्रांती घेणार असून, सोमवारपासून (ता. १६) विदर्भात पुन्हा पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. आज (ता. १३) राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्र (डिप्रेशन) कायम आहे. ही प्रणाली उत्तर प्रदेशातील आग्र्यापासून ५० किलोमीटर पूर्वेकडे, अलिगडपासून ११० किलोमीटर दक्षिणेकडे, तर मध्य प्रदेशातील ग्वालियरपासून ९० किलोमीटर उत्तरेकडे होती. उत्तरेकडे सरकत असलेली ही प्रणाली आज (ता. १३) ओसरण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून दिल्ली तीव्र कमी दाबाचे केंद्र (डिप्रेशन), चुर्क, देहरी, पुरुलिया, कॅनिंग ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटकपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

पावसाने उघडिपीनंतर ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. गुरुवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे सरकला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १३) राज्यात पावसाची उघडीप शक्य असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT