Rain Forecast Agrowon
हवामान

October Rain Alert : ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार; हवामान विभागाचा अंदाज जाहीर

Anil Jadhao 

Pune News : ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) आणि मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात दक्षिण भारतात ११२ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या कालावधीत महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ऑक्टोबर महिन्यात देशात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. या काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच ११५ टक्क्यांपेक्षा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशात ७५.४ मिलिमीटर पाऊस पडतो. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा शक्यता आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजावरून स्पष्ट होत आहे.

हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी (ता. १) दक्षिण भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा (ईशान्य मॉन्सून) हंगाम, मॉन्सूनोत्तर हंगाम आणि ऑक्टोबर महिन्याचा अंदाज जाहीर केला. वायव्य भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. उर्वरित देशात मॉन्सून सक्रिय आहे. मॉन्सून वारे देशातून गेल्यानंतर दक्षिण भारतातील तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा सीमावर्ती भाग, रायलसीमा, केरळ, दक्षिणअंतर्गत कर्नाटक या भागात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होते. हे वारे बंगालच्या उपसागरावरून बाष्प घेऊन येत असल्याने दक्षिण भारतात पाऊस देतात.

१९७१ ते २०२० या कालावधीतील दीर्घकालीन सरासरीनुसार मॉन्सूनोत्तर हंगामात दक्षिण भारतात ३३४.१३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात दक्षिण भारतात सरासरीपेक्षा अधिक (११२ टक्क्यांपेक्षा अधिक) पावसाची शक्यता वर्तविली आहे. संपूर्ण देशाचा विचार करता दक्षिण द्वीपकल्पासह, मध्य भारत, पूर्वेकडील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. देशाचा अति उत्तरेकडील राज्यांसह वायव्य आणि ईशान्य भारताचा काही भागांत सरासरी ते सरासरीपेक्षा कमी अधिक पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, विषुववृत्तीय प्रशांत महासागरात ‘एल-निनो’ स्थिती निवळल्यानंतर सध्या समुद्राच्या पाण्याचे तापमान सामान्य स्थितीत आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात प्रशांत महासागरात ‘ला-निना’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता ७१ टक्के आहे. तर भारतीय समुद्रामधील इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती तटस्थ होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Kisan Installment : नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचं ५ ऑक्टोबरला होणार वितरण

NDDB Dairy Services Kolhapur : परराज्यातील म्हशी मिळणार कोल्हापुरात, 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसचा पुढाकार

Farmers protest : हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी ३ ऑक्टोबरला देशव्यापी रेल्वे रोको आंदोलन

Crop Loan : अद्यापही दोन बँकांकडून एक रुपयाचेही पीककर्ज नाही

Kharif Crop Harvesting : पावसाच्या उघडिपीने खरिपाच्या सुगीला गती

SCROLL FOR NEXT