Agriculture Technology Agrowon
टेक्नोवन

Artificial intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमके काय?

२००२ मध्ये तर आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर घरगुती कामासाठी देखील चालू झाला. रुम्बा नावाचा रोबोट घराच्या स्वच्छतेसाठी वापरला जावू लागला.

Team Agrowon

- नानासाहेब पाटील

आपण शेतकऱ्यांनी आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (Artificial intelligence ) म्हणजे काय ते जरूर समजून घेतले पाहिजे. कारण, तेच आपल्या शेतीचे भवितव्य आहे.

आर्टिफिशियल  इन्टेलिजन्स  म्हणजे यंत्राने मानवी मनासारखे विश्लेषण करणे, तर्क करणे, शिकणे, परिस्थितीनुरूप वर्तन करणे, समस्या सोडविणे, निर्मिती करणे.

त्यातूनच रोबोट (Robot) तयार होणार आहेत. ते आपल्या शेतात चालतील, त्यांना संगणकीय (Computerized) दृष्टी असेल, भाषा असेल, ते आपल्या इच्छेनुसार वागतील आणि परिस्थितीनुसार देखील वर्तन करतील. 

आर्टिफिशियल  इन्टेलिजन्सची पायाभरणी तशी ७० वर्षांपूर्वीच झालेली आहे. त्यानंतर प्रख्यात लेखत इझॅक आसिमोव्ह यांनी आर्टिफिशियल  इन्टेलिजन्स च्या माध्यमातून रोबोटस कशी कामे करतात याविषयी भाष्य केले. विशेष म्हणजे आसिमोव्ह यांच्या कल्पना या प्रत्यक्षात साकारत आहेत. 

मानवासारखी बुध्दिमत्ता प्राप्त करणे हेच आर्टिफिशियल  इन्टेलिजन्स  अंतिम उद्दिष्ट आहे. त्याच दिशेने संशोधनाची सारी पावले पडत आहेत. १९९७ मध्ये जगाला ते दिसून आले कारण बुध्दिबळाच्या मानवी इतिहासातील सर्व बुध्दिमान खेळाडू गॅरी कॅस्पोरोव्ह याला आयबीएम कंपनीने तयार केलेल्या डीप ब्ल्यू नावाच्या सुपरकॉम्प्युटरने बुध्दिबळात पराभूत केले. 

२००२ मध्ये तर आर्टिफिशियल  इन्टेलिजन्सचा वापर घरगुती कामासाठी देखील चालू झाला. रुम्बा नावाचा रोबोट घराच्या स्वच्छतेसाठी वापरला जावू लागला.त्याचा पुढचा टप्पा म्हणजे २००८ ची स्पिच रिकग्निशन टेक्नॉलजी होय.

२००८ मध्ये गुगलने मोबाईलमध्ये स्पिच रिकग्निशन टेक्नॉलजी आणून आर्टिफिशियल इंटिलिजन्टसचा पहिला टप्पा सामान्य माणूस किंवा अगदी शेतक-यांपर्यंत नेऊन पोहचविला. म्हणजे तुम्ही बोलाल त्या प्रमाणे मोबाईल तुमचा आवाज ओळखून कामे करू लागला. 

२०१५ मध्ये मानवी आवाजाची ओळख पटविण्याचे या तंत्राचे प्रमाण ९२ टक्के इतके प्रभावी होते. स्पिच रिकग्निशन टेक्नॉलजी, संगणकाला स्वतःची बुध्दिमत्ता मिळाल्याने २०११ मध्ये आबीएमच्या वॅटसन संगणकाने केन आणि ब्रॅन्ड या दोघा बुध्दिवंतांना हरविले. 

वॅटसनने कोडयांची उत्तरे मानवापेक्षाही अचूक व जलद गतीने सोडविली. आता याच वॅटसनचा उपयोग जगाच्या वैद्यकीय क्षेत्रात होतो आहे. वॅटसन म्हणजे आर्टिफिशियल इन्टेलिजन्सच्या  क्षेत्रात अनेक दशकांपासून काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचा विजय आहे. देशाच्या कृषी क्षेत्रात देखील वॅटसन कधीही येवू शकतो.  

आर्टिफिशियल  इन्टेलिजन्सने  सामान्य नागरिकांना आश्चर्याचा खरा धक्का २०१४ मध्ये दिला. गुगलने करोडो डॉलर्स खर्च करून उभारलेल्या प्रकल्पातून चालक नसलेली कार या वर्षी रस्त्यावर धावली.

गुगलची ही ड्रायव्हरलेस कार, स्पिच रिकग्निशन टेक्नॉलजी, स्कायपेची अतिजलद भाषांतर प्रणाली आणि स्वयंबुध्दिमत्ता असलेला संगणक यातून उद्याचे मानवी जीवन समृध्द झालेले असेल.  

शेती, उद्योग, व्यवसाय, सेवा अशा सर्व क्षेत्रात माणसांची जागा घेण्यात आर्टिफिशियल इन्टेलिजन्स पुढे येत आहेत. संगणक वैज्ञानिक अॅन्ड्यू एनजी यांनी तर "आर्टिफिशियल  इन्टेलिजन्स  ही नवी उर्जा आहे," असे एक ऐतिहासिक विधान केले आहे. 

एकोणिसाव्या शेतकात थॉमस अल्वा एडिसन यांनी जसे जगाला दिशा देणारे शोध बहाल केले तेच आर्टिफिशियल  इन्टेलिजन्सच्या माध्यमातून सध्या होत आहे. 

यंत्रांने स्वतः शिकून मानवी आणि स्वतःच्या तर्कानुसार कामाला सुरूवात केल्याने जगाची दिशा बदलते आहे, असे अॅन्ड्रयू यांना वाटते.

दुसरे मी एक उदाहरण तुम्हाला ब्रिटिश व्हिडिओ डिझायनर डेमीस हबासिस यांचे देवू इच्छितो. जगातील सर्वात बुध्दिमान मानवांच्या यादीत हा हबासीस आहे. "बुध्दिमतेचे गणित मला सोडवायचे असून त्यानंतर याच आर्टिफिशियल  इन्टेलिजन्सचा  म्हणजे कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करून जगातील सर्व काही समस्यांची सोडवणूक करण्याचे माझे ध्येय आहे, असे तो म्हणतो. 

तुम्ही जे सांगाल किंवा तुमच्या चेहऱ्याला ओळखून अगदी मानवाप्रमाणे काम करणारे आर्टिफिशियल इन्टेलिजन्स तयार करण्यात हबासिस गुंतलेला आहे.  

कोणत्याही शेतक-याने जर त्याच्या मोबाईलमध्ये गुगलवर कीड-रोगाविषयी काही शोधण्याचा प्रयत्न केला  तर गुगलचा आर्टिफिशियल इन्टेलिजन्स सेकंदाला ४० हजार घटक शोधून अपेक्षित उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे. 

कृषी यंत्रमानव (अग्रीकल्चरल रोबोटस्), पीके व मातीचे संनियंत्रण (क्रॉप अॅन्ड सॉर्ईल मॉनिटरींग) आणि अंदाजविषयक विश्लेषण म्हणजे प्रिडिक्टिव्ह अॅनॅलिटिक्स) अशा तीन क्षेत्रांमध्ये जगभर आर्टिफिशियल इन्टेलिजन्स विखुरले गेले आहे. 

माणसांपेक्षाही वेगाने व उत्तम कामे करणारी शेतीमधील यंत्रमानव तयार करणे, ड्रोन्स व सॉफ्टवेअरचा उपयोग करून पिके आणि मातीचे आरोग्य सांभाळणे, पर्यावरणाचे पिकाच्या उत्पादन व उत्पादकतेवरील परिणामांचा अंदाज घेऊन विश्लेषण करणे, ही प्रमुख उद्दीष्टे आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Farmers Death : मराठवाड्यातील ५०१ पैकी २९७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरण मदतीसाठी पात्र

Rohit Pawar On Farmers Issue: कृषिमंत्री कोकाटेंवर रोहित पवारांचा हल्लाबोल; 'मिस्टर जॅकेट' म्हणत केली टीका

Kharif Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत १५ लाख ४३ हजार ३७२ हेक्टरवर पेरणी

Sustainable Farming : शाश्वत शेतीकडे वळणे गरजेचे

Mango Farming : मोहर येण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याचे तंत्र

SCROLL FOR NEXT