Team Agrowon
गव्हाची भारी जमिनीत लागवड केलेली असल्यास १८ दिवसांच्या अंतराने हा पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात.
मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने सात पाळ्या द्याव्यात तर हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसाच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात.
पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था व या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनावर परिणाम होतो.
मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे मुकुटमुळे कमी फुटतात.
फुटवे फुटण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास ओंब्या कमी बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या ओब्यांची लांबी कमी होते. उत्पादनात घट येते.
पीक फुलोऱ्यात असताना पाण्याचा ताण पडल्यास परागसिंचन कमी होऊन दाण्याची संख्या घटते.