डॉ. धीरज कंखरे
Milk Purity Test: दुधामध्ये पीठ, युरिया, वनस्पती तूप आदी घटकांची भेसळ केली जाते. ही भेसळ ओळखण्यासाठी विविध चाचण्या आहेत. त्यांचा वापर करून आपण दुधाच्या गुणवत्तेची तपासणी करू शकतो.
पिठाची भेसळ : दुधात काही थेंब टिंक्चर आयोडिन किंवा आयोडिन द्रावण टाकावे. निळा रंग आल्यास स्टार्च किंवा पीठाची भेसळ आहे, असे समजावे.
युरियाची भेसळ : परीक्षानळीत मोठ्या चमच्याएवढे दूध घेऊन त्यात अर्धा चमचा सोयाबीन पावडर मिसळावी. पाच मिनिटांनी लाल लिटमस पेपर टाकावा. अर्ध्या मिनिटाने लिटमस पेपरला निळा रंग आल्यास युरिया भेसळ असल्याचे समजावे.
वनस्पती तुपाची भेसळ : परीक्षानळीत ३ मिली दूध घेऊन त्यात हायड्रोक्लोरिक अॅसिडचे १० थेंब आणि एक चमचा साखर मिसळावी. लाल रंग आल्यास वनस्पती तुपाची भेसळ सिद्ध होते.
फॉरमॅलिनची भेसळ : परीक्षानळीत १० मिलि दूध घेऊन त्यात ५ मिलि सल्फ्युरिक अॅसिड बाजूने टाकावे. जांभळ्या किंवा निळ्या रंगाची रिंग होऊन दोन थरांत दिसल्यास फॉरमॅलिनची भेसळ आहे असे समजावे.
रबडीमध्ये ब्लॉटिंग पेपर भेसळ : एक चमचा रबडी घेऊन, त्यात ३ मिलि हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि ३ मिलि डिस्टिल्ड वॉटर मिसळावे. मिश्रण चांगले एकत्र करावे. एकत्र करताना ग्लास रॉटला तंतू असल्यास ब्लॉटिंग पेपरची भेसळ समजावी.
खवा व खवायुक्त पदार्थात पीठ (स्टार्च) भेसळ : थोडा खवा पाण्यात गरम करून थंड करावा. त्यात आयोडिनचे काही थेंब टाकावेत. निळा रंग आल्यास पिठाची भेसळ आहे, असे समजावे.
तूप, कंडेन्स्ड मिल्क, कॉटेज चीज, खवा, दूध पावडरीत कोल्टार डायची भेसळ : ५ मिलि सल्फ्युरिक अॅसिड एक चमचा नमुन्यात टाकून विरघळू द्यावा. त्यासाठी परीक्षा नळी हलवावी. त्यात गुलाबी रंग भेसळ दर्शवतो.
गोड दह्यामध्ये वनस्पती तुपाची भेसळ : एक चमचा दही परीक्षानळीत घेऊन, त्यात १० थेंब हायड्रोक्लोरिक अॅसिड मिसळावे. पाच मिनिटे एकत्र केल्यानंतर लाल रंग आल्यास वनस्पती तुपाची भेसळ असल्याचे ओळखावे.
तुपामध्ये बटाट्याचा चुरा, रताळे, पीठ यांची भेसळ : तुपाच्या नमुन्यात आयोडिनचे काही थेंब टाकल्यास तपकिरी रंगाचा बदल निळ्या रंगात झाल्यास भेसळ आहे हे समजावे.
काही दिवसच टिकतो. पिंडी खवा सर्वसाधारण तापमानाला (३० अंश सेल्सिअस) चार ते पाच दिवस, तर दाणेदार धाप खवा तीन दिवसांपर्यंत टिकतो. खव्याच्या निर्मितीत हाताळणीदरम्यान स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
पॉलिथिन बॅगमध्ये खवा पॅक केल्यास आणि ३७ अंश सेल्सिअस तापमानाला साठवल्यास चार ते पाच दिवस चांगल्या स्थितीत राहतो. पॉलिथिनमध्येच ७ अंश सेल्सिअस तापमानास २५ ते २५ दिवसांपर्यंत टिकू शकतो.
भेसळ ओळखण्यासाठी कीट काही जण पाण्यामध्ये युरिया, सोयाबीन तेल, मीठ, साखर, स्कीम मिल्क पावडर, ग्लुकोज पावडर, कॉस्टिक सोडा इत्यादी मिसळून कृत्रिम दूध तयार करतात. अशा दुधाची चव प्यायल्यानंतर शेवटी थोडी कडूसर जाणवते. हे कृत्रिम दूध द्रवरूप साबणासारखे दिसते. गरम केल्यावर पिवळे पडते.
भेसळ ओळखण्यासाठी परीक्षानळीत एक चमचा पदार्थाचा नमुना घेऊन त्यामध्ये ५ मिलि सल्फ्युरिक अॅसिड किंवा हायड्रोक्लोरिक अॅसिड मिसळावे. मिश्रण एकजीव करावे. यानंतर गुलाबी रंग (जर डायलूट सल्फ्युरिक अॅसिड घेतल्यास) किंवा किरमिजी रंग (जर हायड्रोक्लोरिक अॅसिड घेतल्यास) आढळल्यास 'कोल (कोळसा) टार डाय'ची भेसळ आहे हे ओळखावे.
आइस्क्रीमवर लिंबाचा रस टाकल्यानंतर फेस आढळल्यास सदर आइस्क्रीममध्ये वॉशिंग पावडरीची भेसळ असण्याची शक्यता असते.
तुपातील भेसळ ओळखण्यासाठी परीक्षानळीत ०.५ ग्रॅम तूप घेऊन त्यामध्ये १ मिली पाणी मिसळावे. यामध्ये एक थेंब आयोडीन किंवा टिंक्चर आयोडीन मिसळावे, निळा रंग स्टार्चची भेसळ दर्शवतो.
दुग्धजन्य पदार्थातील भेसळ कशी ओळखावी ?
मोठ्या प्रमाणात खवा विकत घेताना खव्याचा आतील भाग तपासून पाहावा. फॅट नसलेल्या दुधापासून खवा बनवल्यास तो पृष्ठभागावर कोरडा जाणवतो.
परीक्षानळीत थोडासा खवा घेऊन त्यामध्ये पाणी मिसळावे. हे मिश्रण गरम करून खोलीच्या तापमानास थंड करावे. यामध्ये १ते २ थेंब आयोडीन सोल्यूशन मिसळावे. निळा रंग आल्यास खव्यात स्टार्चची भेसळ आहे, हे समजावे.
खव्यामध्ये शर्कराकंद, शिंगाड्याचे पीठ, बटाटे, मैदा इत्यादी भेसळ म्हणून वापरतात. खव्याचे वजन वाढवण्यासाठी या भेसळीचा वापर होतो.
थोडा खवा हातावर घेऊन रगडल्यास तुपासारखा चिकटपणा जाणवतो, याचा अर्थ खवा शुद्ध आहे हे कळते, शिवाय तुपाचा छान सुगंधही येतो.
पाणी टाकून खवा फेटून घेतल्यावर कठीण असा आढळला तर भेसळीची शक्यता असते. जर खवा खूप ढिला पडला तर रिफाइंड ऑईलची भेसळ असल्याची शक्यता असते. लोण्यासारखा मुलायम जाणवल्यास खवा शुद्ध आहे असे समजावे.
खव्यात थोडे सल्फ्युरिक अॅसिड, साखर टाकल्यानंतर निळा किंवा गुलाबी रंग आढळल्यास खव्यात वनस्पती तुपाची भेसळ असल्याची शक्यता असते.
सर्वसाधारण तापमानाला खवा काही दिवसच टिकतो. पिंडी खवा सर्वसाधारण तापमानाला (३० अंश सेल्सिअस) चार ते पाच दिवस, तर दाणेदार धाप खवा तीन दिवसांपर्यंत टिकतो. खव्याच्या निर्मितीत हाताळणीदरम्यान स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
पॉलिथिन बॅगमध्ये खवा पॅक केल्यास आणि ३७ अंश सेल्सिअस तापमानाला साठवल्यास चार ते पाच दिवस चांगल्या स्थितीत राहतो. पॉलिथिनमध्येच ७ अंश सेल्सिअस तापमानास २५ ते २५ दिवसांपर्यंत टिकू शकतो.
भेसळ ओळखण्यासाठी कीट
काही जण पाण्यामध्ये युरिया, सोयाबीन तेल, मीठ, साखर, स्कीम मिल्क पावडर, ग्लुकोज पावडर, कॉस्टिक सोडा इत्यादी मिसळून कृत्रिम दूध तयार करतात. अशा दुधाची चव प्यायल्यानंतर शेवटी थोडी कडूसर जाणवते. हे कृत्रिम दूध द्रवरूप साबणासारखे दिसते. गरम केल्यावर पिवळे पडते.
अशा भेसळयुक्त दुधाची तत्काळ तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेने सहज, सोपे असे दूध तपासणी किट विकसित केले आहे. घरगुती स्तरावर वापरता येणाऱ्या या किटमध्ये रसायन, परीक्षा नळी, माहिती पुस्तिका, रंगांचा तक्ता इत्यादी सामग्री दिली आहे. हे किट लहान, मध्यम, मोठे अशा प्रकारात उपलब्ध आहे. या किटमार्फत दुधातील युरिया, नायट्रेट खत, पाँड वॉटर, स्टार्च सिरीयल फ्लोअर, सुक्रोज, ग्लुकोज, न्यूट्रलायझर आणि हायड्रोजन पेरॉक्साइड यांची भेसळ काही मिनिटात ओळखणे शक्य होते.
कृत्रिम दूध कसे ओळखावे ?
बऱ्याच ठिकाणी कृत्रिम दूध बनवून विकले जाते. युरिया, सोयाबीन तेल, मीठ, साखर, स्कीम मिल्क पावडर, ग्लुकोज पावडर, कॉस्टिक सोडा इत्यादी पाण्यात मिसळून कृत्रिम दूध तयार करतात. अशा दुधाची चव प्यायल्यानंतर शेवटी थोडी कडसर जाणवते. द्रवरूप साबणासारखे हे दूध दिसते. गरम केल्यास पिवळे होते.
- डॉ. धीरज कंखरे ८३७८०५३२६४
(तांत्रिक प्रमुख, देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय,पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.