Dairy Adulteration: दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी केंद्राने मागविल्या सूचना

FSSAI Guidelines: केंद्र शासनाने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या सूचना आणि उपाययोजना मागविल्या आहेत.
Milk Adulteration
Milk Adulteration Agrowon
Published on
Updated on

Pune News: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे (FSSAI) दूध उत्पादक, व्यावसायिक आणि विषय तज्ज्ञांकडून ‘निर्भेळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ’ यांच्याशी साधर्म्य दाखवणाऱ्या भेसळयुक्त ‘साम्यत्व दूध आणि दुग्धजन्य पदार्थ’ यातील फरक ग्राहकांपर्यंत सहज, स्पष्ट आणि पारदर्शक पद्धतीने दिसून यावा, यासाठी सूचना आणि उपाययोजना मागविल्या आहेत.

Milk Adulteration
Milk Adulteration Committee: दूध भेसळ रोखण्यासाठी समिती स्थापन

याबाबत माहिती देताना पशुतज्ज्ञ डॉ. नितीन मार्कंडेय म्हणाले, की अनेक ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ म्हणून दुधातील संयुक्त घटकांच्या विविध पदार्थांची विक्री होत आहे. याबाबत दूध व्यावसायिक आणि प्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे चिंता व्यक्त केली होती. या समस्येची चर्चा लोकसभा आणि विधान परिषदेमध्ये देखील झाली आहे. दुधातील भेसळ थांबवणे आणि दुधासारखा असणारा घटक वापरलेला पदार्थ दुग्धजन्य पदार्थ म्हणून विक्री करण्यास प्रतिबंध करणे, याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे २०११ मध्ये नियमावली प्रकाशित करण्यात आली. यामध्ये साम्यत्व दुग्धजन्य पदार्थांची व्याख्या नियमावलीतील उपकलम २.१.१ प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये दुधाऐवजी किंवा त्यातील एखाद्या घटकाऐवजी बदलण्यात आलेल्या दुसऱ्या घटकाचा उल्लेख विक्री होणाऱ्या पदार्थांवर स्पष्टपणे निर्देशित करणे अनिवार्य केले आहे.

Milk Adulteration
Milk Adulteration : भोसेतील दूध भेसळ प्रकरणातील आरोपींना राजस्थानमधून अटक

शुद्ध निर्भेळ दूध उत्पादनासाठी प्रयत्न

दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ आणि साम्यत्व विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन प्राधिकरणातर्फे चर्चासत्र दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये साम्यत्व दुग्धजन्य पदार्थ विषयक शिफारसींचा आढावा तयार करण्यात आला. तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरिंग सेवा पुरवणाऱ्या विविध संस्थांशी संपर्क करून प्राधिकरणाने ग्राहकांसाठी साम्यत्व दुग्धजन्य पदार्थ असा उल्लेख असलेला मजकूर स्पष्टपणे प्रकाशित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे देशात शुद्ध निर्भेळ दूध उत्पादन आणि विक्री करणाऱ्या उद्योजकांना फायदा होणार आहे. तसेच ग्राहकांनाही भेसळ आणि रसायन अवशेषमुक्त दुग्धजन्य पदार्थांची खात्री मिळणार आहे.

लिंकद्वारे नोंदवा मत

येत्या दोन महिन्यांत संबंधितांनी आपले मत लेखी स्वरूपात मांडण्यासाठी प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर गुगल लिंक उपलब्ध करून दिली आहे. लिंक याप्रमाणे : (https://forms.gle/olyh2vCmMs7XvgEK8)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com