IVF Technology Agrowon
टेक्नोवन

IVF Technology : ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाला ‘माफसू’ देणार प्रोत्साहन

Animal Care : लिंग वर्गीकृत वीर्यमात्राद्वारे वासरीच तयार केली जाणार आहे. राज्यातील सहा पशु व मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून याकरिता खास कार्यक्रम राबविणार आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘‘अधिक दूध देणाऱ्या गायीच्या वळूची वीर्यमात्रा त्यासोबतच अधिक गाय देणाऱ्या गाईंचे अंडबीज याचा वापर करुन आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यात अधिक दुध देणाऱ्या गाई विकसित करण्यावर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पुढील काळात भर देणार आहे,’’ अशी माहिती ‘माफसू’चे कुलगूरू डॉ. नितीन पाटील यांनी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधताना दिली.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘आयव्हीएफ’व्दारे वर्षभरात ७५ ते १०० गाई मिळू शकतील. महाराष्ट्रातील कोकण कन्या, गवळाऊ, डांगी, देवणी, लाल कंधारी या स्थानिक ब्रीडचे संवर्धन व त्यांची दुध उत्पादकन क्षमता देखील वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याकरिता ‘माफसू’ची यंत्रणा पशुपालकांकडे जात या तंत्रज्ञानाचे फायदे पटवून देणार आहे.

राजस्थान आणि पंजाबवरुन गाई आणल्या आहेत. गीर, साहिवाल, थारपारकर जातीच्या या गाईंच्या अंडबीजांचा वापर करण्याचे देखील या अंतर्गत प्रस्तावित आहे. अकोला, परभणी, राहूरी कृषी विद्यापीठाकडे गाई आहेत. त्यांचाही उपयोग या कामी केला जाणार आहे.’’

‘‘लिंग वर्गीकृत वीर्यमात्राद्वारे वासरीच तयार केली जाणार आहे. राज्यातील सहा पशु व मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून याकरिता खास कार्यक्रम राबविणार आहे. ‘माफसू’कडून यापूर्वी काही दत्तक गावे घेण्यात आली होती.

त्यात नव्याने काही गावांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. या गावांमध्ये देखील आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे. यापूर्वी कुत्रिम रेतनाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता.

स्ट्रॉव्दारे वीर्य मात्रा दिल्यानंतर मोकाट वळूशी अशा गाईंचा संबंध आल्यास त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. परिणामी मोकाट वळूंसाठी वंधत्व कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. संशोधनाला चालना मिळावी याकरिता आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय संशोधन संस्थांबरोबर करार करण्यावर भर देणार आहोत,’’ असेही डॉ. पाटील म्हणाले.

महाविद्यालयाच्या कामांना गती

सावळी बाजार (नगर), जळगाव (खान्देश) तसेच अकोला येथे पशुवैद्यक महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. त्या कामांना प्रशासकीयस्तरावर गती देण्यात आली आहे. लवकरच या महाविद्यालयाच्या कामांना सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.

‘माफसू’च्या संकेतस्थळावर पशुपालनाशी संबंधित सर्व प्रकारची महिती उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे. प्रक्रिया उद्योजकांच्या गरजा जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. औषध कंपन्या, पशु खाद्य उत्पादकांशी देखील संवाद साधला जाईल. पशुपालन क्षेत्रातील यांत्रीकिकरण, कंपोस्टिंग कसे करावे, याबाबत माहिती देण्यात येईल. स्लरी व्यवस्थापन याविषयी तांत्रीक माहिती देखील पशुपालकांपर्यंत पोचविण्यात येईल.
- डॉ. नितीन पाटील, कुलगूरू, माफसू.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT