IVF म्हणजे काय ?

सध्याच्या काळात वैदयकिय क्षेत्रातील प्रजनन शास्त्रात होत असलेल्या प्रगतीचे एक उत्तम उदाहरण म्हणून टेस्टटयुब बेबी (Test Tube Baby) म्हणजेच बाहय फलन प्रक्रीया या तंत्रज्ञानाकडे पाहिलेजाते.
What is In-vitro Fertilzation In Animals ?
What is In-vitro Fertilzation In Animals ?

सध्याच्या काळात वैदयकिय क्षेत्रातील प्रजनन शास्त्रात होत असलेल्या प्रगतीचे एक उत्तम उदाहरण म्हणून टेस्टटयुब बेबी (Test Tube Baby) म्हणजेच बाहय फलन प्रक्रीया या तंत्रज्ञानाकडे पाहिले जाते. ज्याला इंग्रजीमध्ये IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टीलायझेशन (InVitro Fertilization) असं म्हणतात. माणसातील वंध्यत्व (Infertility) निवारणासाठी एक उत्तम पर्याय म्हणून या तंत्रज्ञानाकडे पाहिलं जाते. मनुष्य व प्राण्यांमध्ये जरी IVF करण्याचे उद्दिष्ट हे वेगवेगळे असले तरी पण प्रक्रिया अगदी सारखीच असते. हेही पाहा - भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान 

टेस्टटयुब बेबी म्हणजे स्त्रीबीज व शुक्राणुचे फलन (Fertilization) शरीराच्या बाहेर प्रयोगशाळेत एका काचेच्या डिशमध्ये करणे होय. सदरचे तंत्रज्ञान हे गोवंशीय प्रजनन शास्त्रातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानापैकी एक समजलं जात असून यामुळे दुग्धव्यवसायात फार मोठी क्रांती घडुन येणार आहे.  या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चांगली वंशावळ असणाऱ्या गायीच्या स्त्रीबीज (Ovum) कोषातुन बिजांड एका विशिष्ट्र सोनोग्राफी (Sonography) अवजाराच्या सहाय्याने बाहेर काढून सदरचे स्त्रीबीज प्रयोगशाळेत आपल्याला पाहीजे त्या वळुच्या विर्याच्या सहाय्याने फलित केले जाते व तयार होणारे भ्रूण गायीच्या गर्भाशयात सोडले जातात. सदयस्थितीत महाराष्ट्रात शासकीय,निमशासकीय व खाजगी संस्थेमार्फत मोठया प्रमाणावर पशुपालकांच्या दारामध्ये जनावरांमधील टेस्टटयुब बेबी तयार करणे व सदर तयार भ्रूण (Embryo) पशुपालकांच्या मालकीच्या गायीमध्ये सोडण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com