Solar Subsidy : नाशिक केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या नाशिक परिमंडळातील वीज ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत परिमंडळातील ७४ हजार ५५७ ग्राहकांनी छतावर सौर यंत्रणा बसवून पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी केले आहे. स्वतः वीज निर्माते बनत या ग्राहकांकडून २६० मेगावॉट क्षमतेची वीजनिर्मिती सुरू झाली आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली..महिन्याला ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. .Free Electricity Scheme: बळीराजा मोफत वीज योजनेच्या दर सवलतीपोटी १,४३७ कोटी निधी मंजूर.योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफटॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना केंद्र सरकारकडून एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ६० हजार रुपये, तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते. हाउसिंग सोसायट्यांनाही ५०० किलोवॉटपर्यंतच्या प्रकल्पासाठी प्रतिकिलोवॉट १८ हजार रुपये अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार महिन्याला अंदाजे १२० युनिट वीजनिर्मिती होते..Smart Meter: दिवसा वीज वापरावर साडेचार कोटींची सवलत.छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून निर्माण झालेली वीज घरगुती वापरासाठी वापरता येते. गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यास वीजबिल शून्य येण्यास मदत होते. याशिवाय सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणास हातभार लागतो आणि ग्राहकांनाही आर्थिक लाभ मिळतो. रूफटॉप सोलर प्रकल्प उभारणाऱ्या ग्राहकांना आवश्यक असलेले नेट मीटरही मोफत बसविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॉटपर्यंतच्या क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकांकडून कर्जही उपलब्ध आहे..वीज ग्राहकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच नोंदणीसाठी ‘पीएम सूर्यघर’ हे मोबाईल ॲप उपलब्ध आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेत्याची निवड करता येते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.