Indian Tractor Agrowon
टेक्नोवन

Tractor Exports: भारताच्या ट्रॅक्टर उद्योगाने गाठला निर्यातीचा विक्रम

एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान ट्रॅक्टर निर्यातीत (Tractor Export) ५४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून या काळात १ लाख ६९७५ ट्रॅक्टर निर्यात करण्यात आले. ट्रॅक्टर निर्यातीचा हा ट्रेंड अजूनही तसाच सुरु राहणार असल्याची शक्यता आहे.

Team Agrowon

भारताने ट्रॅक्टर निर्यातीत चांगली कामगिरी केली असून एप्रिल ते जुलै २०२२ दरम्यान निर्यातीत २०१३ सालच्या याच कालावधीच्या तुलनेत २२४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी गुरुवारी ( २५ ऑगस्ट) ट्विट करून ही माहिती दिली.

केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' (Make in India) या महत्वाकांक्षी अभियानामुळे आणि ट्रॅक्टर उद्योगाकडून गेल्या काही महिन्यांपासून केल्या गेलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचे पियुष गोयल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केले.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या ट्रॅक्टर उद्योगाच्या एकूण उत्पन्नातील १० टक्के महसूल हा निर्यातीच्या (Tractor Export) माध्यमातून येतो. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदाच ट्रॅक्टर उद्योगाने वर्षाकाठी १ लाख ट्रॅक्टर निर्यातीचा टप्पा गाठला.

२०२१ च्या ऑगस्टमध्ये भारताने ११,७६० ट्रॅक्टरची निर्यात केली होती. जानेवारी २०२१ मध्ये भारतीय ट्रॅक्टर उद्योगाने ९२३४ युनिट्स निर्यात केले होते. डिसेंबर २०२१ मध्ये ११,१८६ युनिट्स निर्यात केले होते.

एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान ट्रॅक्टर निर्यातीत ५४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून या काळात १ लाख ६९७५ ट्रॅक्टर निर्यात करण्यात आले. ट्रॅक्टर निर्यातीचा हा ट्रेंड अजूनही तसाच सुरु राहणार असल्याची शक्यता आहे. मागच्या आर्थिक वर्षात याच कालावधीत भारतीय ट्रॅक्टर उद्योगाने ६९,४२१ ट्रॅक्टर निर्यात केले होते.

यावर्षी जून महिन्यात सर्वाधिक १२,८४९ ट्रॅक्टर भारताबाहेर रवाना (Tractor Export) करण्यात आले. यापूर्वीचा सर्वाधिक मोठा आकडा सप्टेंबर २०२१ मधला ( १२६९० ट्रॅक्टर) होता. उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या १३ महिन्यांपासून ट्रॅक्टर निर्यातीचा ट्रेंड सलग वाढता राहिला आहे.

या देशांनी केली भारताकडून ट्रॅक्टर खरेदी

भारताकडून अनेक देश ट्रॅक्टर खरेदी करतात. यावर्षी अमेरिकेने भारताकडून सर्वाधिक (२५.२ टक्के) ट्रॅक्टर्सची खरेदी केली. अमेरीकेनंतर नेपाळने भारताकडून (७.३ टक्के) ट्रॅक्टर खरेदी केली. भारतीय ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या देशांत बांगलादेशचा (६.५ टक्के) क्रमांक लागतो. थायलंड (५.४ टक्के) आणि श्रीलंका (५.३ टक्के) असे हे चित्र आहे. याखेरीज ब्राझील आणि तुर्कीतील खरेदीदारांकडूनही थोड्या फार प्रमाणात भारतीय ट्रॅक्टर्सची खरेदी केली जाते.

काय आहेत निर्यातवाढीमागील कारणे?

ट्रॅक्टर उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या मते केंद्र सरकारचे परदेशी व्यापार धोरण भारताच्या ट्रॅक्टर निर्यातीवाढीसाठी कारणीभूत ठरले आहे. १ एप्रिल २०१५ पासून राबवण्यात आलेल्या नव्या परदेशी व्यापार (FTP) धोरणामुळे (२०१५ ते २०२०) यापूर्वीच्या निर्यात योजनांना गती मिळाली.

निर्यातीस चालना येण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच्या योजनांत सुधारणा केली. तसेच २०१७ साली नव्या धोरणाचा आढावा घेऊन त्यात सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली. कोविड महामारीचा (COVID-19) विचार करून हे या धोरणाला २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात दळणवळणासाठी एक स्वतंत्र विभाग सुरु करण्यात आल्याचेही सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे उद्योग क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे.

सुरुवातीच्या काळात भारतात विविध क्षमतेच्या ट्रॅक्टर्सची रेंज उपलब्ध नव्हती. त्यामुळे निर्यातीवर मर्यादा होत्या. मात्र आता ३० एचपी पेक्षा कमी क्षमतेच्या ट्रॅक्टरपासून ते ६० एचपीपासून ते १२० एचपी क्षमतेपर्यंत ट्रॅक्टर्सची व्हरायटी उपलब्ध असल्यामुळे अनेक देशांच्या मागणीनुसार त्यांना हव्या त्या क्षमतेचे ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही या क्षेत्रातील सूत्रांनी नमूद केले.

भारताबाहेरील शेतीचा आकार आणि यांत्रिकीकरणाचा (Farm mechanization) वेग लक्षात घेता तिथे शेतीच्या नित्य कामासाठी जास्तीत जास्त प्रमाणात उपकरणांचा वापर केला जातो. त्यामुळे त्यांना अधिकाधिक उन्नत तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ट्रॅक्टर्स हवे असतात. त्यांच्या गरजा ओळखून उत्पादन केल्यास भारतीय ट्रॅक्टर उद्योगासाठी (Indian Tractor Industry) ही बाजारपेठ लाभदायक ठरू शकेल, असेही या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT