Paddy Cultivation :भात लागवड क्षेत्रात ६ टक्क्यांची घट

झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड या प्रमुख भात उत्पादक (Rice Producing States) राज्यांतील भात लागवडीत मोठी घट झाली आहे.
Paddy Cultivation
Paddy CultivationAgrowon

पुरेशा पावसा अभावी यंदाच्या खरिपात भात (paddy Cultivation) लागवडीखालील क्षेत्रात ५.९९ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २६ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ३६७.५५ लाख हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली.

मागच्या वर्षी याच कालावधीत भात लागवडीखाली ३९०.९९ लाख हेक्टर क्षेत्र होते. झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड या प्रमुख भात उत्पादक (Rice Producing States) राज्यांतील भात लागवडीत मोठी घट झाली आहे.

Paddy Cultivation
बिहारमधल्या 'मिथिला मखाना'ला जिआय टॅग

जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने काही राज्यांतील पेरण्या रेंगाळल्या. झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील भात लागवडीचे (paddy Cultivation) क्षेत्र घटले आहे.

यंदा तूर लागवडीतही घट झाली आहे. मागच्या वर्षी ४७.२० लाख हेक्टरवर तूर लागवड झाली होती. यंदा ४४.०७ लाख हेक्टरवर तूर लागवड झाली आहे. उडदाचाही पेरा किंचित घटला आहे. २६ ऑगस्टपर्यंत ३६.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर उडदाची लागवड झाली. मागच्या वर्षी याच कालावधीत ३७.९१ लाख हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली होती.

Paddy Cultivation
इंडोनेशियाने पामतेल निर्यातीत सातत्य राखावेः एसईए

या खरीपात तेलबिया (Oil seeds) लागवड क्षेत्रात घट नोंदवण्यात आली.केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार १८६.४८ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड झाली असून मागच्या वर्षी याच कालावधीत १८८.६२ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड करण्यात आली होती.

तृणधान्य लागवड क्षेत्रात या खरिपात वाढ दिसून आली आहे. मागच्या वर्षी तृणधान्यांखाली १६९.३९ लाख हेक्टर क्षेत्र होते. यंदा २६ ऑगस्टपर्यंत १७६.३३ लाख हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य पेरणी झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com