Makhana
MakhanaAgrowon

बिहारमधल्या 'मिथिला मखाना'ला जिआय टॅग

मिथिला मखनाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येईल. मिथिला मखानाला (Mithila Makhana) जिआय टॅग (GI) मिळाल्यामुळे बिहारबाहेरील जनतेलाही या प्रोटीन फूडची माहिती मिळेल
Published on

भागलपूरचा जरदाळू आंबा,कटरनीचा तांदूळ, नवाद्याचे मघई पान, मुजफ्फरपूरच्या शाही लिचीसोबतच आता बिहारमधील मिथिला मखानाही (Mithila Makhana) प्रकाशझोतात आला आहे. मिथिलेच्या मखान्याला नुकतेच 'जीआय' टॅग मिळाला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी ट्विटरच्या माध्यमातून मिथिला मखानाला जिआय टॅग मिळाल्याची माहिती दिली. मिथिला माखनाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येईल. मिथिला मखानाला (Mithila Makhana) जिआय टॅग मिळाल्यामुळे बिहारबाहेरील जनतेलाही या प्रोटीन फूडची माहिती मिळेल, त्यांच्यामधून मखानाची मागणी वाढेल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

युरील फेरॉक्स सॅलिस्ब (Euryale Ferox Salisb) असे मखानाचे वनस्पतीशास्त्रातील नाव आहे. कमळाचे बी अथवा फॉक्स नट म्हणूनही मखाना ओळखले जाते. सध्या पॅकबंद पॉकिटमध्ये मखाना बाजारात विकल्या जाते. प्रोटीन फूड म्हणून लोकांनी मखानाला पसंती दिलीय.

Makhana
इंडोनेशियाने पामतेल निर्यातीत सातत्य राखावेः एसईए

नेपाळच्या सीमेशी जवळ असणाऱ्या बिहारमधील मिथिला प्रांतात मखाना (Mithila Makhana) पिकतो. मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह अशा पोषक घटकांमुळे मखाना मानवी आहारात महत्वपूर्ण समजला जातो.

सरकारच्या निर्णयाचा फायदा मिथिला प्रांतातील ५ लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बिहारमधील मिथिला हा प्रांत आता तिथल्या मखाना या उत्पादनामुळे देशभरात ओळखला जाईल, अशी प्रतिक्रिया दरभंगाचे खासदार गोपालजी ठाकूर यांनी ट्विटरवर व्यक्त केली.

Makhana
Rice import: बांगलादेशकडून मागणी वाढल्याने तांदूळ वधारला

केंद्र सरकारच्या वन डिस्ट्रीक्ट वन प्रोडक्ट (ODOP) या उपक्रमा अंतर्गत मिथिला प्रांतातील शेतकऱ्यांनी मखाना लागवडीत चांगली कामगिरी केली. आता मखानाला जिआय टॅग मिळाल्यामुळे त्यांच्या उत्पादनाला देशभरातून मागणी वाढेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com