Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Kharif Season : पावसाच्या उघडिपीने खरीप पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. पश्‍चिम भागात भात लागण वेगाने सुरू आहे.
Published on

Satara News : पावसाच्या उघडिपीने खरीप पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. पश्‍चिम भागात भात लागण वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात (ऊस वगळून) खरिपातील ८५ टक्के पेरणीची कामे उरकली असून, सर्वाधिक सोयबीनची ७२ हजार १४३ हेक्टरवर लागवड झाली आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांत खरीप पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

जिल्ह्यात मे महिन्यापासून पाऊस सुरू झाल्याने मशागत व पेरणीची कामे रखडली होती. जून व जुलै महिन्यात अधूनमधून पावसाने विश्रांती दिल्यावर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू ठेवली. पावसामुळे शेतात उपळे लागतील या भीतीन अनेक शेतकऱ्यांनी कच्च्या घातेवरही पेरणी केली आहे. मशागत व कच्च्या घातीमुळे पेरणीनंतर शेतात मोठ्या प्रमाणात तण आले आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : चंद्रपूर जिल्ह्यात तीन लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

यामुळे शेतकऱ्यांनी तणनाशकांच्या फवारण्यावरील खर्च वाढला आहे. पश्चिम भागाच्या तुलनेत दुष्काळी तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने व उन्हाळी पाऊस जास्त असल्याने खरिपाची पेरणी जास्तीच्या क्षेत्रावर झाली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी (ऊस वगळून) दोन लाख ९७ हजार ९१४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी दोन लाख ५४ हजार २८२ हेक्टर क्षेत्रावर पेरणीची कामे उरकली आहेत.

यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या ९२,८७५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ७२ हजार १४३ हेक्टरवर (७८ टक्के) पेरणी झाली आहे. भाताच्या सर्वसाधारण क्षेत्रापैकी ३८ हजार ९७३ हेक्टरवर (८२ टक्के) लागवड झाली आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण तालुक्यांत खरिपात बाजरी प्रमुख पीक असून या बाजारीची ३५ हजार ७३१ हेक्टरवर (७१ टक्के) पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : नऊ हजार हेक्टरने क्षेत्र घटले

खरिपात ज्वारी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ज्वारीची आतापर्यंत ४९४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उसाची लागवड सुरू असून, सध्या उसाच्या रोपाची लागवड करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. आडसाली उसाची २५ हजार ११४ हेक्टरवर लागवड उरकली आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र हेक्टरमध्ये

सातारा १९,८५४, जावळी १३,०४४, पाटण ३९,९३७, कऱ्हाड २९,९७६, कोरेगाव १९,७००, खटाव ४४,२०८, माण ३९,४०९, फलटण १७,६९८, खंडाळा १३,४४२, वाई १३,५४४, महाबळेश्‍वर ३,४७०

आकडेवारी दृष्टिक्षेपात...

खरीप पेरणी :८५% पेरणी पूर्ण (ऊस वगळून)

सोयाबीन

पेरणी झालेले क्षेत्र : ७२,१४३ हेक्टर

टक्के ः ७८

भात

पेरणी झालेले क्षेत्र : सुमारे ३२,००० हेक्टर

टक्के ः ८२%

बाजरी

पेरणी क्षेत्र : ३५ हजार ७३१ हेक्टर

टक्के ः ७१%

ज्वारी

पेरणी क्षेत्र : ४,९४९ हेक्टर

ऊस लागवड सुरू

क्षेत्र : २५ हजार ११४ हेक्टर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com