Ethix Water Condishnor
Ethix Water Condishnor Agrowon
टेक्नोवन

Saline Water : क्षारयुक्त पाण्यापासून मुक्ती देणारे एथिक्स वॉटर कंडिशनर

टीम ॲग्रोवन

पाणी आणि शेती (Agriculture Irrigation) यांचा संबंध अतूट आहे. पाणी नुसते असून चालत नाही तर ते कसे आहे, किती प्रमाणात आहे यावरही शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी (Agriculture Production) अवलंबून असतो. क्षारयुक्त जड (Saline Water) पाणी पिकांना उपयुक्त नसते. पाण्यातील क्षार कमी करणारे तंत्रज्ञान विकसित झाले आहेच. पुण्यातील ‘एथिक्स वॉटर कंडिशनर’ पाण्यातील क्षारांचे विघटन करून पाण्याची गुणवत्ता वाढवते ज्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनाच्या दर्जावर दिसून येतो

पदवीधर असलेले महेश कांबळे गेली १३ वर्षे RO, STP, WTP यांचे निर्माते आणि व्यावसायिक आहेत. योगायोगाने त्यांची ओळख बारामतीच्या युवा कृषी पदवीधर असणाऱ्या पल्लवी नवले यांच्याशी झाली आणि २०१७ मध्ये ‘इमेर्जिंग एथिक्स पॉवर एलएलपी’ (Emerging Ethix Power LLP) सुरी झाली.

चुंबकीय तंत्रज्ञान वापरून जड पाणी हलके करण्याचे प्रयोग जगभर होतात. दुबई, इस्राईल, आफ्रिका, जर्मनी, कुवेत, टांझानिया अशा देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीसाठी लागणारे पाणीही पुरवले जाते आणि फायदा मिळवला जातो. भारतात मात्र हे प्रमाण कमी दिसते. कूपनलिकेच्या पाण्यातील क्षारामुळे जमीन क्षारपड होणे, जमिनीचा पोत खराब होणे, त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होणे, पीक जळणे, झाडांच्या/ पिकांच्या मुळाची तोंडे बंद होणे, तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन पाइपलाइनवर आतून क्षाराचा थर जमा होऊन त्या लवकर खराब होणे असे दुष्परिणाम शेतकऱ्यांना सातत्याने दिसत असतात.

या त्रासातून शेतकऱ्यांना मुक्त करून त्यांचे पीक उत्पादन वाढवणे आणि देखभालीवर होणारा अतिरिक्त खर्च कमी करणे, या हेतूने कांबळे आणि नवले यांनी ही कंपनी सुरू केली. प्रशिक्षित आणि कुशल तंत्रज्ञांची टीम सोबत घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान इथे पुरवले जाते आणि शेतकऱ्यांची समस्या समूळ सोडवली जाते.

घरगुती वापरासाठी अल्फा सीरिज (Alpha Series) आणि व्यावसायिक, शेतीविषयक आणि औद्योगिक वापरासाठी डेल्टा सीरिज (Delta Series) त्यांनी बाजारात आणल्या आहेत. हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे आणि पर्यावरणपूरक आहे. मोठ्या कंपन्या, हॉस्पिटल्स, अपार्टमेंट्‌स, विद्यापीठे, हॉटेल्स, कूलर्स, बॉयलर्स, चिलर्स, स्वीमिंग पूल, आणि इतर अनेक क्षेत्रांत मागणी आहे.

एकदा बसवल्यानंतर याच्या देखभालीसाठी खर्च येत नाही आणि नंतरही सेवा मिळते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या यंत्रणेमध्ये आणि प्रक्रियेमध्ये पाणी अजिबात वाया जात नाही. सर्वच्या सर्व पाणी आपल्याला क्षाररहित आणि रसायनविरहित स्वरूपात मिळते. भारतभरात शेकडो विक्रेते डीलर्स, रिटेलर्स, प्लंबर असोसिएशन, बांधकाम व्यावसायिक, तेवीस हजार ग्राहक, ११५ पुरस्कार, जगभरात हजारो ग्राहक आणि ८६० यशस्वी प्रकल्प असा हा वाढता प्रकल्प आहे.

गुणवत्ता आणि दर्जा हे कुठल्याही व्यवसायाच्या यशाचे गमक आहे, असे ते मानतात. त्यामुळे उत्पादने उत्तम दर्जाची बनवली जातात. अनेक चांगल्या कल्पना तितक्याच कल्पकतेने प्रत्यक्षता आणल्या तर समस्येचे निराकरण, ग्राहकांना परवडेल अशा पद्धतीने करता येते. ज्यासाठी ग्राहक पैसे मोजतात त्याचा पुरेपूर मोबदला आणि समाधान देणे, हे त्यांचे ध्येय आहे.

२० वर्षांचे आयुष्य, दोन वर्षांची वॉरंटी, एकदा गुंतवणूक केली की परत पाहावे लागत नाही आणि पाण्याचा एक थेंबही वाया जात नाही, ही त्यांच्या उत्पादनाची वैशिष्ट्ये. त्यांच्या या कामावर बरेच शोधनिबंध प्रकशित झाले आहेत. जड पाण्याची समस्या पर्यावरणपूरक पद्धतीने सोडवणे हे उद्दिष्ट असणारी एथिक्स वॉटर कंडीशनर ही संशोधनावर आधारित यंत्रणा असून ती आपल्या घर, इमारतीमध्ये किंवा शेतात पाणीपुरवठा करणाऱ्या लाइनला बसवले जाते.

शेती क्षेत्रात ही यंत्रणा बसवणे खूप सोपे आहे. विहीर, तलाव किंवा पालिका, ग्रामपंचायती यांच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर बसवली जाते. ही यंत्रणा पाण्याची काठीण्य पातळी कमी करते, पाण्याचा पंप किंवा स्प्रिंकलर्सवर क्षाराचा जमा होऊ देत नाही, जमा होणारा थर दूर करते, पाणी जमिनीत मुरण्यास मदत करते. त्यामुळे भाजीपाला, वनस्पती यांची चांगली वाढ होते. मुळांची उत्तम वाढ होऊन त्यांची पाणी आणि पोषकमूल्ये शोषून घेण्याची क्षमता सुधारते.

त्यामुळे रासायनिक खते वापरण्याची गरज कमी होते. पिकांच्या वाढीदरम्यान निर्माण होणारी उष्णता कमी करते. जिप्सम आणि आम्लाची गरज पूर्णपणे किंवा अंशत: कमी होते. पाणी साठून राहणाऱ्या भागात शेवाळ वाढण्याचे प्रमाण कमी होते. शेतीबरोबर पशुपालन व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, रोपवाटिका, पॉलिहाउस, फुलशेती, कोल्ड स्टोअरेज अशा पूरक व्यवसायातही ही यंत्रणा उपयुक्त ठरली आहे.

केवळ पाच लाख इतक्या गुंतवणुकीपासून सुरुवात झालेला हा व्यवसाय आता दोन कोटींचा टप्पा पार करून पुढे घोडदौड करीत आहे. त्यांनी काही पेटंटसाठीही अर्ज केले आहेत. महाराष्ट्रात ते ‘व्यवसाय ते ग्राहक’ आणि महाराष्ट्राबाहेर ‘व्यवसाय ते विक्रेते’ अशा दोन्ही पातळ्यांवर ते काम करतात. संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान इत्यादी राज्ये आणि देशाबाहेर कुवेत, दुबई, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशात त्यांचे विक्रेते आहेत.

पिकांची वाढ पूर्वीपेक्षा चांगली होत आहे, जमीन भुसभुशीत झाली आहे... अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया त्यांचा उत्साह वाढवणाऱ्या आहेत. भविष्यात कृषी महाविद्यालयांसोबत काम करून विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा मानस आहे. त्यामुळे विद्यार्थी शेतकऱ्यांशी जोडले जातील, त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि अर्थार्जनही होईल. त्यांचे कृषिसेवा केंद्रांनाही आवाहन आहे, की या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी यामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करावे.

महेश कांबळे, संस्थापक, एथिक्स वॉटर कंडिशनर,

sales@ethixwaterconditioner.com, १८००-१२३-६४६३

पल्लवी नवले, संचालक संस्थापक, एथिक्स वॉटर कंडिशनर ८४५९०५४००६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT