Animal Husbandry Agrowon
टेक्नोवन

Animal Husbandry : गुणवत्ता सुधार कार्यक्रमातून जातिवंत पैदास

Article by Dr. S.P. Gaikwad : दुधाच्या गुणवत्तेत सतत सुधारणा करणे हे चांगल्या प्रकारे तयार केलेल्या प्रजनन कार्यक्रमांद्वारे गोठ्यातील गायींच्या सुधारणेवर अवलंबून असते. जागतिक तापमानवाढीच्या काळात शाश्वत वंश तयार करणे, गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन महत्त्वाचे आहे.

डॉ. एस. पी. गायकवाड

Animal Caste Breed : दुधाच्या गुणवत्तेत सतत सुधारणा करणे हे चांगल्या प्रकारे तयार केलेल्या प्रजनन कार्यक्रमांद्वारे गोठ्यातील गायींच्या सुधारणेवर अवलंबून असते. जागतिक तापमानवाढीच्या काळात शाश्वत वंश तयार करणे, गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन महत्त्वाचे आहे.

वातावरणाचा ताण : आपल्या वातावरणाला तग धरणारी, उपलब्ध आहाराचा चांगला उपयोग करणारी वंशावळ हे महत्त्वाचे ध्येय आहे.

जास्त दूध उत्पादन : कमी दुधाच्या जास्त गाई सांभाळण्यापेक्षा जास्त दुधाच्या कमी गाई सांभाळाव्यात.

दुधाची गुणवत्ता : कमी आजारी पडणाऱ्या, जास्त प्रथिने असणाऱ्या, कमी सोमॅटिक सेल असणाऱ्या दूध उत्पादक वंशावळीची मागणी आहे.

रोग प्रतिकारशक्ती : रोग प्रतिकारक वैशिष्ट्यांसाठी योग्य प्रजनन केल्याने दुग्धजन्य आजार कमी होण्यास मदत होते, परिणामी गाय निरोगी राहाते. पशुवैद्यकीय खर्च कमी होतो. रसायन अंश विरहित दूध उत्पादनास चालना मिळते.

पाचनशक्ती : आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते खाऊन जास्त दूध उत्पादन करणारी वंशावळ तयार करावी.

गुणवत्ता सुधार कार्यक्रम

वातावरणातील बदल तसेच बदलती जागतिक दुधाच्या गुणवत्तेची मानके याचा विचार करून आपणास आपला वंशावळ गुणवत्ता सुधार कार्यक्रम ठरविणे आवश्यक आहे.निवडक प्रजनन तंत्राद्वारे गोठ्यातील जनावरांमध्ये आपणास भविष्यासाठी आवश्यक असणारे गुण वाढवणे हे गुणवत्ता जाती सुधारणा कार्यक्रमांचे उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमामध्ये प्रगत पुनरुत्पादन तंत्रज्ञान, आनुवंशिक निवड साधने आणि जनुक तंत्रज्ञानाचा वापर, उच्च दुधाचे उत्पादन, दुधाची गुणवत्ता , रोग प्रतिकारशक्ती आणि दीर्घायुष्य या गुणांचा विचार करावा लागणार आहे.

गुणवत्ता सुधार कार्यक्रमाचे प्रमुख घटक

आनुवंशिक निवड

प्रजननासाठी प्रजननासाठी उत्कृष्ट गाय ओळखण्यासाठी दूध उत्पादन, कासेची रचना, आरोग्य आणि प्रजनन क्षमता लक्षात घेतात.

आनुवंशिक निवड निर्देशांक दूध गुणवत्ता आणि नफ्यामध्ये योगदान देणाऱ्या वैशिष्ट्यांना प्राधान्य देण्यास मदत करतात.

आपल्या गोठ्यातील जातिवंत निरोगी उच्च दूध उत्पादक गाईंची निवड करून वंश सुधारणा कार्यक्रम राबवावा.

कृत्रिम रेतन

इष्ट आनुवंशिक वैशिष्ट्यांसह जातिवंत वळूच्या रेतमात्रा वापराव्यात.

सिद्ध वळू

आपणास आवश्यक इष्ट गुणधर्म आहेत हे सिद्ध झालेला वळू निवडावा.

विदेशी वळू

काही विदेशी वळू आपल्या वातावरणात आवश्यक गुणधर्म दाखवत असतील तर ते सुद्धा वापरले पाहिजे. प्रगत

देशात निवड पद्धतीने वळू निवडलेले असतात. याचा फायदा घेऊन वंश सुधार कार्यक्रम कमी वेळेत पूर्ण करू शकतो.

लिंग निश्चित रेतमात्रा

लिंग निश्चित रेतमात्रांचा वापर महत्त्वाचा आहे. कमी कालावधीत आपल्या गोठ्यात चांगल्या वंशावळीच्या जास्तीत जास्त गाई आपण तयार करू शकतो. यामुळे व्यापक जनुकीय सुधारणा शक्य होते. हे तंत्र उत्कृष्ट आनुवंशिक प्रगतीचा वेग वाढवते.

जनुकीय चाचणी

वासरू लहान असतानाच त्याची जनुक चाचणी करून त्याचा जनुक अगोदरच माहिती संकलित केलेल्या कोणत्या गाईच्या जनुकाशी जवळपास साधर्म्य दाखवतात त्यावरून त्याची गुणवत्ता सांगता येते.

या तंत्राने लहान वयातच आनुवंशिक क्षमतेचा अचूक अंदाज देऊन जनावरांच्या प्रजननात क्रांती घडली आहे. जनुकीय तंत्रज्ञान प्रजननकर्त्यांना कोणत्या जनावराचे प्रजनन करायचे याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते. परिणामी जलद आनुवंशिक

लाभ आणि अधिक अचूक निवड करता येते.

भ्रूण हस्तांतरण

या तंत्रामध्ये आनुवांशिकदृष्ट्या श्रेष्ठदाती गाय आणि जातिवंत वळूची रेतमात्रा वापरून भ्रूण तयार करून तो प्राप्तकर्त्या गाईमध्ये प्रस्थापित केला जातो.

यामध्ये प्राप्तकर्ती गाय फक्त गर्भ वाढविण्याचे काम करते. त्यामुळे गाईचे कोणतेही गुणधर्म हे वासरात येत नाही, ती फक्त वाहक म्हणून काम करत असते. दाता गाईची बिजे आणि दाता वळूची रेतमात्रा भ्रूण तयार करण्यासाठी वापरली जाते.त्यांचेच गुणधर्म वासरात दिसतात.

भ्रूण निर्मितीचे प्रकार

गाईच्या गर्भाशयातील भ्रूण निर्मिती

गर्भाशयाच्या बाहेर भ्रूण निर्मिती

या तंत्रामध्ये दाती गाई आणि दाता वळू हे तंत्र प्रजननकर्त्यांना अभिजात जनुकशास्त्राचा अधिक कार्यक्षमतेने प्रसार करण्यास आणि पिढीचे अंतर कमी करण्यास फार महत्त्वाचे आहे.

गुणवत्ता सुधार कार्यक्रमाचे फायदे

दुग्धोत्पादक जनावरांची आनुवंशिक क्षमता वाढविण्यासाठी आनुवंशिक आणि पुनरुत्पादन तंत्रज्ञानातील प्रगतीचा उपयोग करून हे लक्ष्य साध्य करण्यासाठी दर्जेदार जाती सुधार कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे.

दुग्धोत्पादन कार्यक्षमता, गुणवत्ता आणि जनावरांचे आरोग्य सुधारणारे गुणधर्म निवडून पशुपालक जातिवंत दुधाळ गाईंची संख्या वाढवू शकतात.

डॉ. एस. पी. गायकवाड,

९८८१६६८०९९

(लेखक गोविंद मिल्स ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा.लि, फलटण, जि.सातारा येथे महाव्यवस्थापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

Kashmir Cold Weather : हिमवृष्टीने काश्‍मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला

Memorandum of Understanding : दापोली येथील कृषी विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाशी करार

Sugar Factory : वेळेत परवाने दिल्याने ३८ कारखान्यांची धुराडी पेटली

Farmer Producer Organizations : ‘एफपीओं’ना बीजोत्पादनात आणा; केंद्राच्या सूचना

SCROLL FOR NEXT