Mango Processing  Agrowon
टेक्नोवन

Mango Processing Technic : आंबा प्रक्रियेसाठी सुधारित यंत्रे

Advanced Fruit Processing : आंबा फळामध्ये ॲन्टीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर आहेत. विविध प्रकारचे मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. आंब्यापासून चटणी, गर, स्क्वॅश, फोडी, पोळी, लोणचे, पन्हे, आमचूर, जॅम, स्क्रॅश आणि सिरप निर्मिती करता येते. आंबा प्रक्रियेसाठी विविध यंत्रे उपलब्ध आहेत.

Team Agrowon

यशवंत जगदाळे, समाधान खुपसे

आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व क असते. हे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. फळात बीटा-कॅरोटीन असते, जे जीवनसत्त्व अ मध्ये रूपांतरित होते. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसुद्धा असतो. आंब्यातील तंतूमय घटक पाचनक्रिया सुधारतात. फळामध्ये ॲन्टीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर आहेत. त्याच्यामुळे मुरूम आणि त्वचेच्या इतर समस्या कमी होतात.हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

आंब्यामध्ये जीवनसत्त्व बी-६, जीवनसत्त्व अ आणि जीवनसत्त्व क खूप अधिक प्रमाणात असते.पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि तांबे भरपूर प्रमाणात असते. कोलेस्टरॉल कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदात आंब्याची कोय आणि पानांचे औषधी उपयोग सांगितले आहेत. त्याचा उपयोग पाचनशक्ती वाढवण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी होतो.

प्रक्रियायुक्त पदार्थ

१. लस्सी

साहित्य : दोन आंबे, दोन कप आंबट नसलेले दही, अर्धा कप साखर, एक कप बर्फाचे तुकडे

कृती : सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंड करून घ्यावे. थोडावेळ थंड करण्यासाठी ठेवावे.

२. मिल्क शेक

साहित्य: दोन आंबे, २ कप दूध, ३ चमचे साखर, १ कप बर्फाचे तुकडे

कृती :सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंड करून घ्यावे. त्यानंतर २० अंश सेल्सिअस तापमानाला ठेवावे.

३. आम्रखंड ः

साहित्य: दही १ किलो, मॅंगो ४ नग, साखर ६ चमचे.

कृती : सर्वप्रथम एका पातळ कपड्यामधून दही पूर्ण पाणी निघेपर्यंत गाळून घ्यावे. शिल्लक राहिलेला चोथा परत एकजीव करण्यासाठी स्टीलच्या चाळणीमधून काढून घ्यावा. त्यानंतर तो एकजीव करून फेटून घ्यावा. आंब्याचा रस तयार करून त्यात साखर मिसळून शिजवून घ्यावे. शिजवलेले मिश्रण फेटून घेतलेल्या दह्यामध्ये मिसळावे. परत फेटून एकजीव करून आम्रखंड तयार होते.

आइस्क्रीम ः

साहित्य : आंब्याचा रस १ कप, आंब्याच्या फोडी १ वाटी, मिल्क पावडर १ कप, दूध १ कप, साय - १ कप (यामध्ये बाजारात मिळणारे तयार क्रिम वापरु शकता.) साखर - ४ ते ५ चमचे.

कृती : मिल्क पावडर, दूध, साय, साखर, आंब्याचा रस या सगळ्या गोष्टी एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावे. एका प्लॅस्टीकच्या डब्यात हे मिश्रण ओतून फ्रिजरमध्ये ठेवावे. ५ तासांत आइस्क्रीम चांगले तयार होते. तेव्हा ते फ्रीजमधून बाहेर काढून त्यात आंब्याच्या फोडी मिसळा. हे आइस्क्रीम सेट करण्यासाठी पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवावे. ७ ते ८ तासांनी सेट झाल्यावर आइस्क्रीम खाण्यास तयार होईल.

कुल्फी ः

साहित्य: पिकलेले आंबे २, साखर २ चमचे, दूध २ कप

कृती : आंब्याची साल काढून फोडी करून घ्याव्यात. मिक्सरमध्ये आंब्याच्या फोडी, साखर, दूध घालून बारीक करून घ्याव्यात, नंतर कुल्फीच्या साच्यामध्ये किंवा पेपर कप मध्ये हे मिश्रण टाकून फ्रीजमध्ये ७ ते ८ तास सेट होण्यासाठी ठेवावे.

१.पीलिंग, डिस्टोनिंग आणि पल्पिंग यंत्र ः

या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर ताज्या आंब्याचे रसामध्ये रूपांतर करण्यासाठी वापरतात. यंत्र मजबूत आणि गंज-प्रतिरोधक स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असते. विविध चेंबर्समध्ये फळापासून कोई वेगळ्याकरून रस तयार केला जातो. फळाची साल काढण्यासाठी ब्लेड्स आणि रोलर्सचा वापर केला जातो.

२.पाश्चरायझेशन यंत्र ः

या यंत्राचा उपयोग आंबा रस, जॅम, पल्प आणि इतर अन्नपदार्थांच्या संरक्षणासाठी केला जातो. पाश्चरायझेशनमुळे अन्नातील हानिकारक सूक्ष्मजीवांचा नाश होतो, साठवणूक क्षमता वाढते. पोत व चव टिकून राहते.

पॅकेजिंग यंत्रः

स्वयंचलित किंवा अर्ध-स्वयंचलित यंत्र उपलब्ध आहे. हे यंत्र रस किंवा तरल पदार्थांचे पॅकेजिंग करण्यासाठी वापरतात. हे यंत्र रस भरणे, कॅपिंग, लेबलिंग, आणि पॅकिंगसाठी वापरले जाते.

फिलिंग युनिट: यामध्ये रस योग्य प्रमाणात बाटलीत भरला जातो.

कॅपिंग युनिट: रस भरण्याच्यानंतर सीलिंग करण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

लेबलिंग युनिट: प्रत्येक बाटलीला योग्य लेबल लावण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

पॅकिंग युनिट: सिंगल किंवा मल्टीपल पॅकिंग केले जाते.

संपर्क ः यशवंत जगदाळे, ९६२३३८४२८७

(विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि.पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT