Mumbai Siege Issue: मराठा आंदोलक मुंबईतून परतले असले, तरी आता अंमलबजावणीच्या पातळीवर सरकारला फारशी चालढकल करता येणार नाही. तीनदा परतलेले मराठे परत येणार नाहीतच असे सांगता येत नाही. शेतात राबणाऱ्या हातांनी मुंबईची केलेली कोंडी तीन दिवस सहन झाली नाही. त्यामुळे सरकारने हा लढा अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.