Mango Processing : कच्च्या आंब्यापासून टिकाऊ पन्हे कसे बनवाल?

सध्या बाजारात कच्चा आंब्याची आवक होऊ लागली आहे. कच्च्या आंब्यापासून लोणचे, गोड चटणी आणि पन्हे इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.
Mango Processing
Mango ProcessingAgrowon
Published on
Updated on

सध्या बाजारात कच्चा आंब्याची आवक (Raw Mango Arrival) होऊ लागली आहे. कच्च्या आंब्यापासून लोणचे, गोड चटणी आणि पन्हे इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.

यापैकी आंब्यापासून बनविलेले पन्हे आरोग्यदायी असल्यामुळे लोकप्रिय आहे. मात्र पन्हे (Panhe) केवळ आंब्याचा हंगाम असतानाच कच्च्या आंब्यापासून बनवले जाते.

परिरक्षकाचा वापर करुन दिर्घकाळ टिकणारे पन्हे बनवता येते. त्यामुळे पन्ह्याचा आस्वाद वर्षभरात केंव्हाही घेता येतो.

टिकाऊ पन्हे घरगुती स्तरावर बनवून महिलांना घरच्याघरी चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सांगीतलेल्या तंत्रानूसार टिकावू पन्हे कसे बनवायचे? ते पाहूया.  

कच्च्या आंब्याचे पन्हे कसे बनवायचे?

पन्हे तयार करण्यासाठी पूर्ण वाढ झालेली परंतु कच्ची फळे घेऊन उकळत्या पाण्यात चांगली शिजवावीत. शिजलेली फळे थंड झाल्यावर त्याची साल काढून पल्पर यंत्र किंवा मिक्सरद्वारे त्यांचा गर काढावा.

रायवळ आंब्यापासून पन्हे तयार करताना १ किलो पन्हे तयार करण्यासाठी १०० ग्रॅम कच्च्या आंब्याचा गर, १९० ग्रॅम साखर आणि ७१२ मिलि पाणी घेऊन मिश्रण एकजीव करावे. हे मिश्रण १ मि.मी. च्या चाळणीतून गाळून घ्यावे. 

Mango Processing
Banana Processing : केळीपासून चिप्स, पावडर कशी बनवाल?

मंदाग्नीवर ८५ अंश सेल्सिअस तापमानाला १० ते १५ मिनिटे गरम करून नंतर त्यात टिकविण्यासाठी १२० मिलीग्रॅम पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट हे परिरक्षक मिसळावे.

नंतर हे पन्हे गरम असताना निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावे आणि बाटल्या क्राऊन कॉर्क यंत्राने झाकण लावून हवाबंद कराव्यात.

सदर बाटल्यांचे  ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानाला गरम केलेल्या बाटल्यांचे ३० मिनिटे पाश्‍चरीकरण करावे. बाटल्यांची साठवणूक थंड व कोरड्या जागी करावी. पन्ह्यामध्ये स्वादासाठी थोडी वेलची पावडर व मीठ टाकावे.

हापूस आंब्यापासून पन्हे तयार करताना १७.५ टक्के उकडलेल्या आंब्याचा गर घेऊन वरील पद्धतीने पन्हे तयार करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com