Flower Business: डेझी, गोल्डन रॉडसह अन्य फुलांनी खालला भाव
Pune Flower Market: पुण्यातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीतील फुलबाजार गणेशोत्सव व गौरीपूजनानिमित्त गजबजून गेला होता. विविध रंगी डेझी फुले, गोल्डन रॉड आदींसह नेहमीच्या फुलांनी या वेळी चांगलाच भाव खालला. येत्या काळात नवरात्र, दसरा, दिवाळी अशा सणांनाही फुलांची अशीच मागणी राहून मागणीत वाढ होणार आहे. शेतकऱ्यांनाही चांगले दर मिळतील अशी आशा करायला हरकत नाही.