Dairy Business Agrowon
टेक्नोवन

Blockchain, Robo Technology : दुग्धव्यवसायातील ब्लॉकचेन, रोबो तंत्रज्ञान

ब्लॉकचेन संपूर्ण उत्पादन चक्रामध्ये डेअरी उद्योगातील अन्न आणि पशुधनातील उत्पादनांची नोंदणी ठेवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. याचबरोबरीने सुपर कुलिंग तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचा वापर डेअरी उद्योगामध्ये वाढू लागला आहे.

Team Agrowon

डॉ. अनिता चप्पलवार, डॉ. मीरा साखरे, डॉ.दर्शना सतदिवे

Dairy industry : दूध उत्पादन (milk production) आणि गुणवत्तावाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब फायदेशीर ठरतो. विशेषतः प्रक्रिया तंत्र, वितरण व्यवस्थापन,ब्लॉकचेन तंत्रज्ञान ( Blockchain, Robo Technology) आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर येत्या काळात फायदेशीर ठरणार आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान :

दूध उद्योग आणि पुरवठा साखळीतील (Milk Supply chain) पारदर्शकता ही शाश्वत स्रोतापासून ते प्रक्रियेपर्यंत ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे. ब्लॉकचेन संपूर्ण उत्पादन चक्रामध्ये डेअरी उद्योगातील अन्न आणि पशुधनातील उत्पादनांची नोंदणी ठेवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.

डेअरी उद्योगाच्या अन्नपुरवठा साखळीतील (Food supply chain) पारदर्शकता ही शाश्वत स्रोतापासून ते घटक आणि प्रक्रिया दाव्यांपर्यंत ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी फायदेशीर आहे. जलद गतीने चालणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये पारदर्शकता ही विक्री व्यवस्थापनासाठी महत्त्वाची आहे.

१) गेल्या चार वर्षात विविध उत्पादक कंपन्यांनी अन्न सुरक्षा निदान आणि प्राण्यांच्या जनुकीय तंत्रज्ञानामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणण्यासाठी भागीदारी केली. अन्न उद्योगातील कंपनीला त्यांच्या अन्नपुरवठा साखळीत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान उपयुक्त ठरले आहे.

२) ब्लॉकचेन हा डिजिटल तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आहे. ज्यावर कायमस्वरूपी नोंद तयार करता येते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण उत्पादन चक्रामध्ये डेअरी उद्योगातील अन्न आणि पशुधनातील उत्पादने आणि प्राण्यांचा इतिहास याची संपूर्ण माहिती ठेवली जाते.

३) या तंत्रज्ञानामुळे जनावराचा जनुकीय नकाशा, दैनंदिन खाद्य, जनावराच्या उपचाराचा वैद्यकीय इतिहास, गोठ्याचे वातावरण, दुधाचे प्रमाण आणि गुणवत्ता याची माहिती एकाच ठिकाणी मिळते.

४) ब्लॉकचेन अनेकांच्या संपूर्ण पुरवठा साखळ्यांना अनुकूल बनवू शकते. हे तंत्रज्ञान पुरवठा साखळीच्या सुरवातीपासूनच ग्राहकांपर्यंत उच्च पातळीची पारदर्शकता ठेवते.

लिंग आधारित रेतमात्रा ः

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने गाई आणि म्हशीला फक्त मादी वासराचा जन्म होईल असे कृत्रिम रेतन तंत्र विकसित झाले आहे. यामुळे जातिवंत दुधाळ पैदास गोठ्यामध्ये होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे दूध उत्पादनामध्ये चांगली वाढ होईल.

गुणवत्ता महत्त्वाची ः

सध्याच्या काळात दुधाच्या बाजारपेठेत दूध तसेच दुग्धजन्य पदार्थाची चव आणि गुणवत्ता लेबल महत्त्वाचे आहे. अलीकडच्या वर्षात विक्री तंत्रज्ञानामध्ये विविध तांत्रिक घडामोडी झाल्या आहेत. यामध्ये डेअरी उत्पादनांचा पोत आणि चव सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

आधुनिक डेअरी किण्वन कौशल्यासह विविध स्वाद निर्मितीवर विशेष संशोधन करण्यात येत आहे. यामुळे पदार्थाची चव आणि गुणवत्ता टिकवून ठेवली जाते. डेअरी उद्योगांसाठी ‘डेअरी बाय नेचर’ हा एक महत्त्वाचा तांत्रिक विकास आहे, कारण ते दुग्धव्यवसायाची साधी नैसर्गिक चव वाढवते.

सुपर कुलिंग तंत्रज्ञान ः

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ताज्या उत्पादनांची वाहतूक करणे ही जगातील अनेक दुग्ध कंपन्यांसाठी आव्हान आहे. २०१९ मध्ये युरोपियन डेअरी को-ऑपरेटिव्ह संस्थेने आंतरराष्ट्रीय वाहतूक सक्षम करण्यासाठी सुपर कुलिंग नवीन तंत्रज्ञानाची चाचणी सुरू केली.

हे नवीन तंत्रज्ञान जागतिक डेअरी कंपन्यांसाठी स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय बाजारात उतरण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरले आहे. यामुळे दुधाची वाहतूक सुलभ आणि सुरक्षित झाली आहे.

कासदाह शोधण्याचे तंत्र ः

१) कासेच्या संसर्गामुळे जनावराच्या दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. हे लक्षात घेऊन कासदाह ओळखणारे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. या तंत्रज्ञानामध्ये प्रगत सेंन्सर इमेजिंग आणि मशिन लर्निंग एकत्रित काम करते. यामुळे कासेमध्ये किंवा दुधात संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसण्यापूर्वी, संसर्गाची सुरवातीची लक्षणे शोधण्यात मदत होते.

२) जितक्या लवकर आजाराने संक्रमित जनावर शोधले जाईल, तेवढ्या लवकर त्यांना उत्पादन साखळीतून बाहेर काढले जाऊ शकते. आजारी जनावरावर तातडीने आवश्यक उपचार सुरू करता येतात.

दूध काढण्यासाठी रोबो तंत्रज्ञान ः

मनुष्यबळ, वेळेची बचत आणि योग्य पद्धतीने अधिक उत्पादनक्षम गाईंचे दूध काढण्यासाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर परदेशामध्ये केला जातो. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाण दुधाळ गाईंचे संगोपन केले जाते तेथे या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरले आहे.

डॉ. मीरा साखरे, ९४२३७५९४९०, (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT