Sugarcane Crushing Season: शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका
Narhari Zirwal: दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अन्न, औषध प्रशासन व विशेष साह्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.