Hasan Mushrif on Farm Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्यादा कर्जासह जास्तीत जास्त सवलती मिळायला हव्यात, यासाठी सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार समितीने उपाययोजना सूचवाव्यात, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. .शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे. तो आत्मनिर्भर होण्यासाठी शासनाने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. मंत्री म्हणून नव्हे तर केडीसीसी बँकेचा अध्यक्ष म्हणून याविषयी माझी ठोस भूमिका आहे. त्या समितीला माझी एवढीच विनंती आहे की, वारंवार थकबाकीमध्ये राहून कर्जमाफी घेणाऱ्यांना कर्जमाफी द्यायची की नाही हे त्यांनी ठरवावे. दरम्यान, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्यादा कर्जासह जास्तीत जास्त सवलती मिळायला हव्यात. या समितीने अशी कर्जमाफी वारंवार करायची वेळच येऊ नये. त्यासाठी शेतकरी कर्जबाजारी होऊच नये, यासाठीही उपाययोजना सूचवाव्यात, असे त्यांनी नमूद केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते..Farm Loan Waiver: तीन तास वादळी चर्चा, सरकारकडून रेटारेटी अन् निर्णय...; नेमकी किती होईल शेतकऱ्यांची कर्जमाफी? .चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयावरुन मुश्रीफ नाराजमहायुतीमध्ये भाजप हा आमचा मोठा भाऊ आहे. त्यांनी आम्हा दोन्हीही लहान भावांना सामावून घ्यायला हवे, अशी अपेक्षा मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आमची बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे उपस्थित होते. या बैठकीत काही चर्चा झाली आणि आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पुन्हा बैठक घेण्याचेही ठरले होते. असे असतानासुद्धा चंद्रकांत पाटील यांनी काल पलूस येथे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी जाहीर केली, हे आश्चर्यजनक आहे. याबाबत त्यांची मी भेट घेईन. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका अजून सव्वा वर्षे पुढे आहेत. त्यांना सांगेन या संदर्भात त्या त्या परिस्थितीत तिन्ही पक्ष बसून चर्चेने मेरिटवर निर्णय घेऊ, असे मुश्रीफ पुढे म्हणाले..Bacchu Kadu: स्वतंत्र लढा उभारून तत्काळ कर्जमाफी मिळवावी.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहितास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता लागू होईल. पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुका लागतील आणि नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असा अंदाज आहे. इच्छुक असलेल्या सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करतानाच त्यांनी सांगितले की, उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणीही नाराज होऊ नका. उमेदवारी न मिळालेल्यांना कशा पद्धतीने मानसन्मान द्यायचा यासाठी मी विचार करेन. कारण, महायुती म्हणून आपण सरकारमध्ये सहभागी आहोत. मित्रपक्षांना सोबत घेऊनच ही निवडणूक लढवावी लागेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.