Agriculture AI Agrowon
टेक्नोवन

Agriculture AI : शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता काळाची गरज

Agriculture Technology : कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती विकसित करण्यासाठी कृत्रीम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून घेणे, ही काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.

Team Agrowon

Baramati News : ‘‘कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती विकसित करण्यासाठी कृत्रीम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून घेणे, ही काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.

ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित कृत्रीम बुद्धीमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित ऊस लागवड व नियोजन प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतापराव पवार बोलत होते. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृत्रीम बुद्धीमत्ता विभागाचे संचालक डॉ. अजित जावकर, माजी सनदी अधिकारी दिलीप बंड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे परेश पारेख, डॉ. अशोक कडलक, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘प्रायोगिक तत्त्वावर कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर उसाच्या पिकामध्ये सुरु केला असून, भविष्यात फळे व भाजीपाल्यामध्येही हा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात हे प्रयोग होतील, असा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी ही माहिती इतर सहकारी शेतकऱ्यांना द्यावी.’’

नीलेश नलावडे प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘या उपक्रमासाठी १६० शेतकऱ्यांनी आडसाली उसात कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर सुरु केला आहे. तीस टक्के खर्च कमी करून स्मार्ट सिंचन व शेती नियोजनासाठी प्रयत्न सुरु आहे.’’

मॅप माय क्रॉप कंपनीचे डॉ. भूषण गोसावी, ॲग्री पायलेट कंपनीचे निखिल मानेकर फसल कंपनीचे सौरव शर्मा यांनी त्यांच्या कंपनीमार्फत सुरू असलेले कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रयोगाबाबत माहिती दिली. तेजस्विनी उपाध्ये यांनी कृषी कॅपचा ए.आय.मध्ये वापराबाबत माहिती दिली.तुषार जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. योगेश फाटके यांनी आभार मानले.

शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता वापराच्या प्रयोगानिमित्त गेल्या दोन वर्षांत नऊ वेळा मी बारामतीत आलो आहे. देशातील पहिले फार्म ऑफ द फ्युचर बारामतीत सुरू झाले आहे. वातावरण व जमिनीतील आर्द्रता, तापमान, मृदा स्थिती, पाणी, खते यांच्या उपलब्धतेवरून उत्पादनवार कसा परिणाम होतो, याची माहिती संकलित करून तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार सध्या काम सुरू आहे. पिकांवर येणारा ताण, सिंचन, खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची शिफारस, रोग व कीड, पावसाचा अंदाज इत्यादी गोष्टी यामुळे आपल्याला सुलभ झाले आहे.
- डॉ. अजित जावकर, संचालक, कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग, ऑक्सफर्ड विद्यापीठ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT