domestic fuel gas plant
domestic fuel gas plant Agrowon
टेक्नोवन

Anand Karve : वापरायला सोयीचे घरगुती इंधनवायु संयंत्र

Team Agrowon

कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमती दररोज वाढत असल्याने तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जैवइंधन ) हा एक चांगला पर्याय आहे. बायोमास, वनस्पती, एकपेशीय वनस्पती किंवा प्राण्यांच्या कचऱ्यापासून बनवलेले कोणतेही इंधन जैवइंधन म्हणून ओळखले जाते.

जैवइंधन वायू हे एक अत्यंत उच्च प्रतीचे इंधन असून त्याचा उपयोग पेट्रोल किंवा डिझेल प्रमाणेच अंतर्ज्वलनकारी इंजिनांमध्ये इंधन म्हणून करता येतो. शर्करायुक्त किंवा स्टार्च युक्त त्याज्य पदार्थांवर चालणारे, आकाराने अत्यंत लहान व घरगुती वापरायला सोयीचे असे एक जैवइंधन वायू संयंत्र अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) संस्थेने विकसित केले आहे. या संयंत्राची रुंदी १२० सेंमी व इंधन वायू पूर्ण भरलेल्या अवस्थेतील उंची सुमारे ११० सेंमी असल्याने ते गच्चीत, सज्जात किंवा कोणत्याही अन्य सोयीच्या जागेत ठेवता येईल. 

कसे आहे जैवइंधन वायू संयंत्र?

या सयंत्राचे किण्वनपात्र व वायु धारक असे दोन प्रमुख भाग आहेत. त्यातले किण्वनपात्र हे खालच्या बाजूस असून त्याच्यात बसणाऱ्या उलट्या पिंपाला वायूधारक असे म्हणतात. 

सयंत्र सुरू करताना प्रथम वायुधारक बाजूला काढून ठेवावे व किण्वनपात्रात सुमारे ४० किलो शेण व सुमारे १००० लिटर पाणी मिसळून तयार केलेला शेणकाला भरावा. तो बसवताना वायूधारकाला लावलेला इंधनवायूचा नळ उघडा ठेवावा म्हणजे वायुधारकातली हवा हळूहळू बाहेर पडून वायूधारक किण्वनपात्रात पूर्णपणे बुडेल. मग इंधन वायूचा नळ बंद करावा. 

काही दिवसांनी वायुपात्रात वायू भरल्याने ते वर आलेले दिसेल. इंधनवायूचा नळ सोडून बाहेर पडणाऱ्या वायूच्या प्रवाहात पेटलेल्या आगगाडीची ज्योत धरावी. जर हा वायू पेटला नाही तर त्याचा अर्थ त्यात मीथेनचे प्रमाण फार कमी असून त्यात मुख्यतः कार्बन डाय-ऑक्साइडच आहे. असा न पेटणारा वायू सोडून द्यावा. 

वायूधारकात जमलेल्या वायु पेटलेल्या आगगाडीच्या साह्याने रोज पारखावा. सयंत्र सुरू केल्यापासून सुमारे दहा दिवसांनी चांगल्या प्रकारे जळणारा इंधन वायू मिळू लागेल. 

रबरी नळीच्या साह्याने संयंत्र शेगडीला जोडून हा वायु स्वयंपाकासाठी वापरावा. यासाठी गोबर गॅस साठी वापरली जाणारी शेगडी वापरावी. 

एका कुटुंबाच्या रोजच्या स्वयंपाकासाठी सुमारे १००० लिटर जैव इंधन वायू पुरतो. पण या सयंत्राच्या वायूधारकांची क्षमता केवळ ७५० लीटरच असल्याने, संयंत्रात एकावेळी फक्त एक किलो पीठ घालावे. 

पीठ रात्री घातले की सकाळपर्यंत वायूधारकात सुमारे ७०० लिटर इंधनवायु जमा होतो. सकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली की, संयंत्रात पुन्हा सुमारे १ किलो पिठाचा काला घालावा. म्हणजे पुढच्या स्वयंपाकासाठी पुन्हा नवा इंधन वायू निर्माण होईल. अशाप्रकारे एका दिवशीच्या स्वयंपाकासाठी एकूण सुमारे २ किलो पीठ लागेल. 

संयंत्रात आपण जेव्हा जेव्हा नव्याने काला घालतो तेव्हा तेव्हा त्यातून तेवढाच त्याज्य द्राव बाहेर पडेल. तो गोळा करण्यासाठी निर्गम तोटी च्या खाली एक बादली ठेवावी. हा त्याज्य द्राव वनस्पतींना खत म्हणून वापरता येतो. 

संयंत्रात कोणत्या पदार्थांचा वापर करता येईल?

या संयंत्रात धान्याच्या पिठाऐवजी सुबाभूळ, चिंचोके, करंज, एरंडी, जांभूळ, कलिंगडे, कडूलिंब वगैरे बिया किंवा अखाद्य तेलबियांची पेंड इत्यादी पदार्थ दळून घातले तरी चालतात. त्यांचेही प्रमाण दररोज २ किलो इतकेच असावे. 

केळी, कर्दळ, कडू कारिंदे, खाजरे अळू असे अखाद्य कंद, खरकटे, पानात टाकलेले किंवा उरलेले अन्न, सडके कांदे, सडके टोमॅटो, सडकी फळे किंवा उंबरा सारखे अखाद्य फळे यांचाही यात वापर करता येतो. या प्रकारच्या पदार्थांचा लगदा करून घालावा. वरील पदार्थांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाण्याचा अंश असल्याने त्यांचे वापरण्याचे प्रमाण किती हे अनुभवाने ठरवावे लागेल.

--------------------

स्त्रोत ः पुस्तिका- अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) ने विकसित केलेली तंत्रे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT